Fri, Oct 30, 2020 06:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महायुतीत ज्याच्या जास्त जागा त्याचाच मुख्यमंत्री : नितीन गडकरी 

महायुतीत ज्याच्या जास्त जागा त्याचाच मुख्यमंत्री

Last Updated: Nov 09 2019 2:11AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी 
भाजप शिवसेना युतीत आधीपासून ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. शिवसेनेला कमी जागा येऊनही मुख्यमंत्रीपद देण्याबाबत कोणताही शब्द दिला नव्हता, असे सांगत निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर गडकरी पत्रकारांशी बोलत होते. भाजप शिवसेनेची युती ही दिर्घकाळ आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही ज्यांच्या जास्त जागा त्यांचाच मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट होते, असे असताना शिवसेना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचे ठरले होते, असे सांगत असेल तर ते चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले. जनतेने महायुतीला कौल दिला आहे. दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन करणे अजूनही शक्य आहे. शिवसेनेने तयारी दाखविली तर बोलणी होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. 

 "