Fri, Sep 18, 2020 13:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कसारा घाटात दरडीसह माती रस्त्यावर

कसारा घाटात दरडीसह माती रस्त्यावर

Last Updated: Aug 05 2020 11:16AM

मुंबई- नाशिक महामार्गवर कोसळत असलेली दरड.कसारा (ठाणे) :  पुढारी वृत्तसेवा

मंगळवार रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे  मुंबई- नाशिक महामार्ग काही प्रमाणात विस्कळीत झाला. तर  कसारा घाटात काही ठिकाणी झाडे, काही ठिकाणी दरडीसह मातीचा ढिगारे रस्त्यावर कोसळले आहेत. परिणामी या प्रकारामुळे मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. 

मुंबई- ठाणेसह सर्वत्र पावसाचे प्रमाण जास्त असताना काल रात्रीपासून शहापूर तालुक्यातील मुबंईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रासह परिसरात मोठया प्रमाणात पावसाने जोर घरला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची शेती कामे जोरात सुरु झाली आहेत. मात्र या पावसामुळे मुंबई- नाशिक महामार्ग विस्कळीत होत असल्याचे दिसत आहे. मुंबईहून नाशिककडे जाताना भिवंडी ते गोंदे (इगतपुरी) या दरम्यान महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे व काही ठिकाणी पाणी साचले असल्यामुळे मुंबई- नाशिक व नाशिक- मुंबई या दोन्ही लेनवर वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. तर कसारा घाटात ठिकठिकाणी दरडी, माती, झाडे उन्मळून पडल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कसारा घाटातील दोन्ही लेन या धोकादायक स्थितीत असल्यामुळे घाटातून प्रवास करणे प्रवाशांना जिकरिचे ठरत आहे. 

पीक इन्फ्रा  आणि  NHIचे  दुर्लक्ष 

दरम्यान कसारा घाटासह महामार्गावरील दुरावस्थेकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत असून महामार्गावरील रस्ते दुरुस्ती, कसारा घाटातील दरडी यावर उपाययोजना  करण्यास दोन्ही यंत्रणा दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी भरमसाठ टोल भरून देखील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डोक्यावर टांगती तलवार ठेऊन प्रवास करावा लागत आहे. 
 

 "