Sun, Sep 20, 2020 06:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चॉकलेट देण्याच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार  

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार  

Last Updated: Aug 07 2020 2:48PM

नामदेव श्रीधर मयेकरघाटकोपर (मुंबई) : पुढारी वृत्तसेवा 

घाटकोपरच्या असल्फा विभागात एका शेजाऱ्याने चॉकलेट देण्याचा बहाण्याने बंद खोलीत नेऊन एका सहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना आहे. ही घटना गुरुवारी (दि. ६) रोजी रात्री घडली आहे. नामदेव श्रीधर मयेकर ( वय ४९)असे या गुन्ह्यात अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पीडित मुलगी नेहमीप्रमाणे आपल्या घराबाहेर खेळत होती. नामदेवने त्याच्या शेजारी असलेले कुटुंब गावी गेले होते. त्यांनी घराची चावी नामदेवकडे दिली होती. याचा गैरफायदा घेत नामदेव पीडीत मुलीला खेळत असताना त्या घरात घेऊन गेला. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला. या दरम्यान रात्री उशिर झाला तरी मुलगी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. यावेळी नातेवाईकाना या बंद घराचा दरवाजा बाहेरून उघडा असल्याने संशय आला. त्यांनी दरवाजा उघडून लैंगिक अत्याचार करत असलेल्या नामदेव आणि पीडित मुलीला बाहेर काढले.  यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी नामदेवला चोप देवून घाटकोपर पोलिसांच्या ताब्यात दिले.

घाटकोपर पोलिसांनी कलम ३७६(२) (i) भादंवि पॉस्को ४, ६, ८,१० अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. तसेच नामदेवने याआधीही असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. या घटनेमुळे घाटकोपरमध्ये खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नामदेववर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

 "