Tue, Feb 18, 2020 06:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शामनगर तलावामध्ये अंधेरी, जोगेश्वरी बाप्पाचे विसर्जन

शामनगर तलावामध्ये अंधेरी, जोगेश्वरी बाप्पाचे विसर्जन

Published On: Sep 12 2019 9:28PM | Last Updated: Sep 12 2019 11:51PM
मुंबई : प्रतिनिधी

जोगेश्वरी पूर्वेतील शामनगर तलावामध्ये अंधेरी, जोगेश्वरी येथील शंभराहून अधिक गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. महत्वाचे म्हणजे सार्वजनिक गणेशोस्तव मंडळाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन जय जवान गोविंदा पथकातील मुलांच्याकडून करण्यात येते.  

विशेष करुन शामनगर तलावात जोपर्यंत शेवटचा गणपती विसर्जन होत नाही, तोपर्यंत जय जवान पथकातील मुले विसर्जन स्थळी उपस्थित असतात. शामनगर तलाव येथे ९ वाजेपर्यंत ३५० घरगुती गणपतीचे विसर्जन आणि २ सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे.