Sun, Oct 25, 2020 08:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुशांत प्रकरण : बिहारहून मुंबईत आलेल्या एसपींना सक्तीने केलं क्वारंटाईन

सुशांत प्रकरण : बिहारहून मुंबईत आलेल्या एसपींना सक्तीने केलं क्वारंटाईन

Last Updated: Aug 03 2020 9:34AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेते सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहारहून आलेल्या एसपींना सक्तीने क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पाटणाचे सिटी एसपी विनय तिवारी मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

पाटणा सिटी एसपी विनय तिवारी यांची मुंबईमध्ये आयपीएस मेसमध्ये व्यवस्था करण्यात आली नाही. त्यानंतर बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी विनय तिवारी यांना खासगी जागेत क्वारंटाईन केले. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी रविवारी रात्री ट्विट करून महिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आयपीएस अधिकारी विनय तिवारी  बिहार पोलिस टीमचे नेतृत्व करण्यासाठी अधिकृत ड्यूटीवर आज पाटणाहून मुंबईत पोहोचले. परंतु, बीएमसी अधिकाऱ्यांनी त्यांना सक्तीने क्वारंटाईन केले आहे. विनंती केल्यानंतरदेखील त्यांची आयपीएस मेसमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे ते गोरेगाव (मुंबई)तील एका गेस्ट हाऊसमध्ये थांबले. 

याआधी रविवारी एसपी सिटी विनय तिवारी यांनी मुंबई विमानतळावर म्हटलं होतं की, सुशांत केसचा तपास योग्य दिशेने पुढे जात आहे. ज्या लोकांकडून जबानी नोंदवण्यात आली आहे, त्याचे विश्लेषण केलं जात आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू तपासात मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांच्या टीमला संकटांचा सामना करावा लागत आहे, असे म्हटले जात आहे. 

 "