Wed, Jan 20, 2021 21:59
फक्त पाच महिन्यात तुकाराम मुंढेंचा पुन्हा बदली आदेश! 

Last Updated: Jan 14 2021 1:58AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यात धडाकेबाज अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे (IAS officer tukaram mundhe) यांच्या बदलीचा पुन्हा आदेश आला आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिवपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागली होती. आता फक्त पाच महिन्यानंतर राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (IAS officer tukaram mundhe transferred to state human rights commission) 

मुंढे यांना पाच महिन्यांपूर्वीच नागपूर मनपाच्या आयुक्तपदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना कार्यकाळ पूर्ण न होताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्य सदस्य सचिवपदी नेमणूक करण्यात आली. आता त्यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंढेंसह चार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. एमपीसीएलचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांची मंत्रालयात मार्केटिंग आणि टेक्स्टाईल विभागात वर्णी लागली आहे. डी. बी. गायकवाड यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त सचिवपदी, तर उदय जाधव यांची राज्य बाल हक्क आयोगाचे सचिव म्हणून वर्णी लागली आहे. (IAS officer tukaram mundhe transferred to state human rights commission)