होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Last Updated: Jan 17 2020 1:14AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्यात सत्तांतरानंतर सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मंत्रालयातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे जवळचे समजले जाणारे ब्रिजेश सिंह यांची माहिती व जनसंपर्कमधून बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी महासंचालक म्हणून सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी डी. डी. पांढरपट्टे यांची वर्णी लागली. 

माहिती व जनसंपर्क विभागातील ब्रिजेश सिंह यांच्या बरोबरच प्रवीण दराडे यांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदावरुन आयुक्त समाज कल्याण पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर बदल्यांमधून भाजपला पुन्हा दणका दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने ब्रिजेश सिंह यांना त्यांच्या मूळ सेवेत परत पाठवले आहे. 

महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या या पुढील प्रमाणे आहेत 

१) जे मुखर्जी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मुंबई यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय मुंबई

२) एस ए तागडे, प्रधान सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग यांची बदली प्रधान सचिव वस्त्रोद्योग

३) डॉ. के एच गोविंदराज प्रधान सचिव वस्त्रोद्योग यांची बदली अतिरिक्त महानगर आयुक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई

४) बी वेणुगोपाल रेड्डी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ यांची बदली प्रधान सचिव वने

५) राजीव जलोटा, आयुक्त विक्रीकर यांची बदली अपर मुख्य सचिव ग्रामविकास

६) संजीव कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांची बदली आयुक्त विक्रीकर महाराष्ट्र राज्य मुंबई

७) असीम कुमार गुप्ता प्रधान सचिव ग्रामविकास यांची बदली प्रधान सचिव ऊर्जा

८) शैला ए विक्रीकर आयुक्त यांची बदली अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी, मुंबई

९) पी वेलरासू, सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची बदली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका

१०) श्वेता सिंघल जिल्हाधिकारी सातारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे

११) दीपक सिंगला आयुक्त मृद व जलसंधारण औरंगाबाद यांची नियुक्ती जिल्हाधिकारी गडचिरोली

१२) जिल्हाधिकारी गडचिरोली शेखर सिंग हे सातारा जिल्हाधिकारी पदी

१३) मंजू लक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची बदली जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या पदावर

१४) मिलिंद शंभरकर आयुक्त समाज कल्याण यांची नियुक्ती जिल्हाधिकारी सोलापूर या पदावर