Sat, Dec 05, 2020 23:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभिनेत्रीच्या माध्यमातून काही क्रिकेटपटूंवर हनीट्रॅपचा प्रयत्न?

काही क्रिकेटपटूंवर हनीट्रॅपचा प्रयत्न? 

Last Updated: Jan 15 2020 12:25PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन 

एका बॉलिवूड अभिनेत्रीचे सट्टेबाजारातील मोठ्या तीन बुकींशी संबंध असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर तिच्या या संबंधांमुळे अनेक प्रश्न उभे केले आहेत. एका वृतानुसार, ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांत दुबईमध्ये या तीन बुकींना बर्‍याचदा भेटली होती. तिने काही क्रिकेटर्सना हनीट्रॅपच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न केला होता. बुकींच्या इशाऱ्यानुसार काही सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग किंवा स्पॉट फिक्सिंगसाठी केले जात होते. महत्वाची बाब म्हणजे या अभिनेत्रीने आतापर्यंत जवळपास एक डझन हिंदी चित्रपट केले आहेत.   

अधिक वाचा : संक्रांत : आरोग्य-सलोख्याचा मिलाफ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभिनेत्रीने दोन भारतीय क्रिकेटपटूंकडे संपर्क साधला होता. तर त्यांच्याशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला होता. जमेची बाजू की, नंतर या दोन्ही क्रिकेटर्सनी तिच्याकडे दुर्लक्ष केले होते. याचे कारण ही आता समोर येत आहे. या दोन्ही क्रिकेटर्सना तिचे 'बुकी कनेक्शन' असावे अशी शंका आली होती. या अभिनेत्रीच्या संपर्कात असलेल्या तीन बुकींपैकी एक मध्य प्रदेशातील जबलपूरचा आहे. तर इतर दोन बुकी गुजरातमधील खंबाटचे असल्याचे समोर येत आहे. हे तिघे बुकी गेल्या अनेक महिन्यांपासून दुबईमध्ये सट्टेबाजीचा व्यवसाय करीत आहेत, जेणेकरुन भारतीय तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचू नयेत.

अधिक वाचा : देशभरात सहा वर्षांत तीन हजार वाघांची शिकार

अभिनेत्रीने क्रिकेटर्ससमवेत सेल्फीही घेतली

संबंधीत अभिनेत्रीला त्या दोन्ही भारतीय क्रिकेटपटूंशी जवळीक वाढवत मैत्री करण्यास बुकींनी सांगितले होते. जेणेकरून तिला ड्रेसिंग रूममध्येही प्रवेश मिळावा. ड्रेसिंग रूममध्येही प्रवेश मिळावा याचा अर्थ हा की, ड्रेसिंग रूममध्यील होणारी संपूर्ण माहिती बुकींनी मिळावी. या अभिनेत्रीने दोन्ही क्रिकेटर्सबरोबर बर्‍याच भेटींचे सेल्फीही घेतली आहेत. तर अभिनेत्रीने दुबईमध्ये बुकींसमवेत फोटोही काढले आहेत.

अधिक वाचा : व्हीलचेअर मागितली म्हणून वैमानिकाची प्रवाशाला जेलमध्ये पाठविण्याची धमकी!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी एका बुकीवर मध्य प्रदेशमधील क्रिकेट सामन्यात उपग्रह सिग्नल हॅक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नोंदविण्यात आलेल्या एफआयआरमध्ये हे लिहिले आहे की, त्याने हॅक सिग्नलच्या माध्यमातून आपल्या वेबसाईटवर आयपीएल सामन्याचे थेट प्रक्षेपण केले होते. तसेच या बुकीचे दोन क्लब दुबईमध्ये आहेत, जिथे भारतातील इतर मोठे बुकी एकत्र येतात. 

शाकिब अल हसनवर शेवटची बंदी

सुत्रांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही एका बुकीची भेट होणे योगायोग असू शकते, परंतु या अभिनेत्रीने तीन बुकींशी केलेल्या संवादांच्या पुराव्यामुळे या अभिनेत्रीवर निश्चितच प्रश्न उभे राहतात. तर आतापर्यंत डझनभर क्रिकेटर्सवर बुकींशी असलेल्या संबंधामुळे बंदी घालण्यात आली आहे. यात शाकिब अल हसन याचाही समावेश आहे. शाकिबवर आयसीसीने चार महिन्यांपूर्वी बुकींशी असलेल्या संबंधामुळे बंदी घातली होती. ही आजअखेर शेवटची बंदी आहे.