Tue, Sep 22, 2020 06:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात बाधितांचा आजपर्यंतचा सर्वांत मोठा उद्रेक!

देशात बाधितांचा आजपर्यंतचा सर्वांत मोठा उद्रेक!

Last Updated: May 29 2020 9:22AM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात कोरोनाने महासंकट तयार केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेल्या २४ तासात तब्बल ७ हजार ४६६ रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे मृत्यूच्या आकड्यातही वेगाने वाढ होत असून गेल्या २४ तासात १७५ जणांचा जीव गेला आहे.  त्यामुळे बाधितांचा आकडा १ लाख ६५ हजार ७९९ वर गेला आहे.

अधिक वाचा : देशात १४ कंपन्यांकडून लसनिर्मिती सुरू

देशात ॲक्टिव्ह केसेसवर नजर टाकल्यास ८९ हजार ९८७ असल्याचे दिसून येते. आतापर्यंत  ७१ हजार १०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात आजवर कोरोनाने ४ हजार ७०६ जणांनी कोरोनाने प्राण गमावला आहे.  देशातील ३३.६२ लाख जणांची आतापर्यंत वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती भारतीय वैज्ञानिक संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) देण्यात आली आहे. 

अधिक वाचा : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा; नाना पटोले म्हणाले...

कोरोनाग्रस्तांच्या संख्येसह कोरोनामुक्‍तीचे प्रमाणही वाढत आहे. जवळपास ४३ टक्के कोरोनामुक्‍तीच्या दराने गेल्या सात दिवसांत दररोज तीन हजारांहून अधिक रुग्णांना रुग्णालयांतून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या स्थितीनुसार, दर ५ पैकी २ कोरोनाग्रस्त संसर्गातून बरे झाले आहेत. तर गेल्या सात दिवसांत तीनपैकी एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

२७ दिवसांत साडे तीन हजार बळी

देशातील एकूण ४ हजार ७०६ मृत्यूंपैकी ३ हजार ६३२ कोरोनाबाधितांचा मृत्यू हा गेल्या 27 दिवसांमध्ये (1 ते 27 मे) झाला आहे. देशात दररोज सहा हजारांच्या सरासरीने कोरोनाबाधित आढळत आहेत. या महारोगराईमुळे आता दररोज सरासरी १०० जणांचा मृत्यू होत आहे. मे महिन्यात कोरोना मृत्यूचे प्रमाण हे अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. 

अधिक वाचा : डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, 'त्यामुळे' पीएम मोदी चांगल्या मुडमध्ये नाहीत!

 "