Wed, Sep 23, 2020 08:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वयोवृद्ध कलाकारांना हायकोर्टाचा दिलासा

वयोवृद्ध कलाकारांना हायकोर्टाचा दिलासा

Last Updated: Aug 08 2020 12:36AM
मुंबई ः पुढारी वृत्तसेवा

65 वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या कलाकारांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. ज्येष्ठ नागरिकांना दुकान उघडून त्यांचे दैनंदिन व्यवहार करण्याची परवानगी  दिली जात बसले तर  65 वर्षावरील कलाकारांना शुटींगजा जाण्यापासुन   रोखणे अयोग्य नाही असे स्पष्ट करत न्यायमूर्ती  शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती  रियाझ छागला यांच्या खंडपीठने कलाकारांना बदी घालण्याचा निर्णय रद्द केला. या कलाकारांनी  नियमांचे पालन केले पाहिजे असेही न्यायालयाने स्पष्ट केले.टीव्ही कलाकारांना चित्रीकरणासाठी राज्य सरकारने 30 मे रोजी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार 65 वर्षावरील कलाकारांना चित्रपट अथवा सिरियलच्या सेटवर काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

सरकारच्या यानिर्णयाला आक्षेप घेत 70 वर्षीय प्रमोद पांडे यांनी हायकोर्टात बुधवारी याचिका दाखल केली.या याचिकेवर न्यायमूर्ती  शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती  रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर व्हीसीमार्फत सुनावणी झाली.मागिल सुनावीच्यावेही न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.ज्येष्ठ नागरिकांना दुकान उघडून त्यांचे दैनंदिन व्यवहार करण्याची परवानगी  दिली जाते. 

तर कोणत्या आधारावर 65 वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या कलाकारांना काम करण्यापासून रोखण्यात येते असा संतप्त सवालही उपस्थि केला होता.तसेच या प्रकरणी शरण जग्तीयानी यांची अमायकस क्युरी (न्यायालयीन मित्र) म्हणून नियुक्ती केली होती राज्य सरकारने आपल्या निर्णयाचे समर्थन करताना सर्वच ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक गोष्टीखेरीज बाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे मार्गदर्शक तत्वे भेदभाव करणारी नाहीत. 

ही मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारच्याच नियमावलीनुसार जारी कऱण्यात आली आहेत. मार्गदर्शक तत्वांनुसार ज्येष्ठ कलाकारांना कामावर जाण्यापासून मज्जाव करण्यात अला असल्याचा दावाकेला होता. न्यायमूर्ती  शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती  रियाझ छागला यांच्या खंडपीठने हा दावा  फेटाळून लावला. राज्य सरकारचा निर्णय रद्द करताना  जेष्ट कलाकारांना नियमांचे पालन करून काम करण्यास परवानगी दिली.दरम्यान या निर्णयामुळे वृध्द कलाकारांना दिलासा मिळाला आहे.

खंडपीठासमोर व्हीसीमार्फत सुनावणी

सरकारच्या यानिर्णयाला आक्षेप घेत 70 वर्षीय प्रमोद पांडे यांनी हायकोर्टात बुधवारी याचिका दाखल केली .या याचिकेवर न्यायमूर्ती  शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती  रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर व्हीसीमार्फत सुनावणी झाली.

 "