Sun, Aug 09, 2020 02:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : हार्बर रेल्वे वाहतूक सेवा पूर्ववत

मुंबई : हार्बर रेल्वे वाहतूक सेवा पूर्ववत

Last Updated: Jan 15 2020 7:40AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : प्रतिनिधी

मध्य रेल्वेवर कुर्ला येथे मालगाडीचा डब्बा घसरल्यामुळे मंगळवारी रात्री हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प झाली. परिणामी, वाशी, बेलापूर व पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक कोलमडली होती. मात्र, बुधवारी सकाळी ही सेवा पूर्ववत करण्यात आली.

अधिक वाचा : गोकूळ दूध महागले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११.२७ वाजता मालगाडीचा डबा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. सीएसटी ते पनवेल, बेलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक रात्री उशीरपर्यंत ठप्प होती. परिणामी, वाशी, बेलापूर आणि पनवेला कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

अधिक वाचा : पुणे मेट्रो एप्रिलपासून धावणार, ३२.५ किमीचा मार्ग