Wed, Sep 23, 2020 09:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्रमिक ट्रेनकरिता गुजरातने दिले 102 कोटी

श्रमिक ट्रेनकरिता गुजरातने दिले 102 कोटी

Last Updated: Aug 09 2020 12:42AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

टाळेबंदीमुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी श्रमिक ट्रेन चालविण्यात आल्या. या श्रमिक ट्रेनचा खर्च त्या-त्या राज्याच्या राज्य सरकारने केला आहे. श्रमिकांच्या घर वापसीकरिता गुजरात राज्याने सर्वाधिक 102 तर महाराष्ट्र राज्य सरकारने 85 कोटी रुपये खर्च केले आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील रेल्वेची प्रवासी वाहतुक 22 मार्चपासुन बंद करण्यात आली. त्यामुळे हातावर पोट आसणारे मजुर, कामगार देशाच्या विविध भागात अडकुन पडले. हाताला काम नसल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली. परिणामी त्यांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी राज्यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारने 1 मेपासून देशभर श्रमिक ट्रेन चालविल्या. मजुरांना त्यांच्या घरी पाठविण्याचा सर्व खर्च राज्य सरकारने केला आहे. 

मर्यादित प्रवासी संख्येमुळे रेल्वेला तोटा

एका मजुराच्या तिकिटाचा खर्च साधारणपणे 600 रुपये झाला आहे. तसेच श्रमिक ट्रेन या सेकण्ड क्लास कोचच्या होत्या. रेल्वेने फक्त गाड्या चालविल्या आहेत. या गाड्या चालविण्यातून रेल्वेला फक्त 15 टक्के रक्कम मिळाली आहे. कारण मर्यादित प्रवासी संख्येमुळे रेल्वेला तोटा झाला आहे. महाराष्ट्र राज्यातून  1 मे ते 1 जून पर्यंत एकुण 619 श्रमिक ट्रेन चालविण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने 725 श्रमिक ट्रेनची मागणी केली होती. परंतु अपुर्‍या प्रवासी संंख्येमुळे रेल्वेने 106 गाड्या रद्द केल्या. यामध्ये सर्वाधिक  364 गाड्या युपी, 169 ट्रेन बिहारकरिता चालविण्यात आल्या. तर राजस्थानसाठी केवळ 14 ट्रेन सोडण्यात आल्या होत्या.

 "