Fri, Oct 30, 2020 18:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २०१९ ला भारताला तिसऱ्या स्वांतत्र्यांची गरज : राज ठाकरे

२०१९ ला भारताला तिसऱ्या स्वांतत्र्यांची गरज : राज ठाकरे

Published On: Mar 18 2018 8:11PM | Last Updated: Mar 18 2018 9:46PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

मराठी नववर्षदिनी अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्क (शिवतीर्थावर) मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचा वार्षीक मेळावा आयोजित केला होता.

बऱ्याच दिवसांनंतर आपल्या खास ठाकरी शैलीत भाषण करताना राज ठाकरे यांनी राज्य सरकारबरोबर केंद्र सरकारवरही घणाघाती टीका केली. त्यांनी २०१९ला भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज असल्याचे वक्तव्य केले. याचबरोबर त्यांनी मोदींना हरवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज बोलून दाखवली. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील राजकारणात नवीन समीकरणे आणि आघाड्या बघायला मिळण्याची शक्यता आहे.     

 Live अपडेट :

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : बेसावध राहू नका, हे तुमचे अस्तित्व संपवायला हे टपलेत 

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाला नोटबंदी सत्ताबदलानंतर बाहेर पडेल 

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : महाराष्ट्रातील ४६ टक्के जमीनीचे वाळवंटीकरण होत आहे असा इस्त्रोचा अहवाल आहे आणि आमचे मुख्यमंत्री ५६ हजार विहीरी बांधल्याचे सांगतात 

> शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : मोदींना हटवण्यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र यावे 

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : मोदी जगभर फिरले तेकाय वड्याचे पीठ आणायला गेले होते काय?

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : भारत पारतंत्र्यात, २०१९ ला भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज  

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : सरस्वती वंदनेवेळी मुस्लीम मुले शाळेबाहेर का? 

>१५ लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार हा चुनावी जुमला अस शाह कसकाय म्हणू शकतात

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह :  रतन टाटांमुळे मी गुजरातला गेला, पण माझ्या पूढे खोटे चित्र उभे केले

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह :  राम मंदिर जरुर व्हावे पण २०१९च्या निवडणुकीनंतर 

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह :  पुढच्या काही महिन्यात  देशात राम मंदिरावरुन हिंदू मुस्लीम दंगल 

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : गुजरातला मुंबई हवी होती, यासाठी वल्लभाई पटेलांचा नेहरुंवर दबाव होता   

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : नरेंद्र मोदींच्या बुलेट ट्रेनच्या हट्टासाठी कर्जबाजारी महाराष्ट्र परत कर्ज काढणार 

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : सगळे आंतरराष्ट्रीय पाहुणे गुजरातमध्येच का जातात? मोदी गुजराती अस्मिता जपतात 

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : राफेल डीलबाबत एवढी गुप्तता का 

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : राफेलची किंमत ५०० कोटी आणि मोदी सरकार १६०० कोटीला घेत आहे 

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : मोदी सरकारने बेरोजगार नोंदणी बंद केली आहे. 

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : मुंबई राष्ट्रीय उद्यानही पोखरल जातय 

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : आताचे मुख्यमंत्री बसवलेले मुख्यमंत्री 

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह :  धर्मा पाटील यांना फक्त ४ लाख मोबदला आणि बाजूच्या दलालांना कोटी मोबदला समृध्दी महामार्गात असले गोंधळ होत आहेत

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : महाराष्ट्रात दलाल राज्य करत आहेत

.>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : नीतीन गडकरी नुसते साबणाचे फूगे सोडतात

> शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : हिंदी चित्रपटातूनही मोदी ब्रँडिंग करत आहेत.

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : लोया यांचादेखील संशयास्पद मृत्यू झाला पण माध्यमात त्याची चर्चा झाली का 

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : देवींना राष्ट्रीय इतमामात अंत्यसंस्कार का केले. ही चूक महाराष्ट्र सरकारची 

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : नगंटीवार रजनीकांत यांचे १२वे डमी आहेत 

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : मुनगंटीवार यांचा सांबा असा उल्लेख

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : माहाराष्ट्रातील सर्व समस्या सोडवल्यामुळे मुख्यमंत्री गाणी म्हणत फिरत आहेत  

 >शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : यापुढे गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा होणार  

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : माझा पक्ष संपला असे ज्यांना वाटते त्यांनी व्यसपीठावर यावे आणि ही गर्दी बघावी

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : थोड्याच वेळात राज ठाकरेंचे भाषण सुरु

>शिवतीर्थावरुन राज ठाकरे लाईव्ह : गुढीपाडव्यानिमित्त  शिवाजी पार्कवर मनसेचा वार्षिक मेळाव्याला सुरुवात 

 

 

Tags : Raj Thackeray, MNS, shivaji Park, Gudhi Padwa