Wed, Sep 23, 2020 09:19



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गणपती विशेष ट्रेन सोडण्यास हिरवा कंदील

गणपती विशेष ट्रेन सोडण्यास हिरवा कंदील

Last Updated: Aug 08 2020 12:42AM




मुंबई : दिलीप सपाटे 

कोकणात गणपतीसाठी जाणार्‍या चाकरमान्यांसाठी विशेष ट्रेन सोडण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या विशेष ट्रेन सोडण्यासाठी रेल्वेने 23 जुलै रोजी परवानगी मागितली होती. शुक्रवारी काही अटींवर राज्य सरकारने परवानगीचे पत्र दिले. 

या ट्रेनमधून ज्यांचे कन्फर्म तिकीट असेल व ज्यांना राज्य सरकारने ई-पास दिला असेल त्यांनाच प्रवास परवानगी देण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या विशेष रेल्वे गाड्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या सोशल डिस्टनसिंग आणि सॅनिटायझेशनचे नियम पाळण्यासही राज्य सरकारने सांगितले आहे. त्यामुळे चाकरमान्यांना आता रेल्वेने गणपतीसाठी कोकणात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शक्यतो 12 तारखेपासून या रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन आहे.  23 जुलै रोजी मध्ये रेल्वेने राज्य सरकारकडे गणपती साठी कोकण, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून किकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची परवानगी मागितली होती.

मात्र,कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता कोकणात चाकरमान्यांना येण्यावरून स्थनिक पातळीवरून विरोध आहे. स्थानिक प्रशासनानेही अशीच भूमिका घेतली. कोकणात येणार्‍या चाकरमान्यांना 14 दिवसांचे विलगीकर सक्तीचे करण्याचे ठराव सरपंचांनी केले. त्यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली. त्यामुळे रेल्वेने 23 तारखेला विशेष ट्रेन सोडण्याची परवानगी  मागूनही हा प्रस्ताव दोन आठवडे गुंडाळून ठेवण्यात आला. अन्यथा या आधीही रेल्वे गाड्या सुरू होऊ शकल्या असत्या. कोकणासाठी एसटी बसेस सोडण्याचा निर्णयही नुकताच घेण्यात आला आहे. 


 





 







"