Fri, Nov 27, 2020 22:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोने विक्रमी कडाडले

सोने विक्रमी कडाडले

Last Updated: Jul 03 2020 1:40AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

अनिश्‍चिततेच्या या काळातही सोने दराबद्दलची निश्‍चितता कायम असून, बुधवारी सोन्याच्या दराने विक्रमी पातळी गाठली. दिल्लीत 10 ग्रॅमचा दर 49 हजार रुपयांवर गेला. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 50 हजार 30 रुपये होता. 

चांदीने किलोमागे 50 हजार 900 रुपयांपर्यंत मजल मारली. कमॉडिटी बाजारात सोने 48 हजार 982 रुपये तोळा आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव 1,807 डॉलर प्रतिऔंसवर गेला. 2011 नंतर पहिल्यांदाच सोने प्रतिऔंस 1,800 डॉलरवर गेले आहे.

गुरुवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमला 47 हजार 650 रुपये असून, 24 कॅरेटचा भाव 48 हजार 650 रुपये झाला आहे. बुधवारच्या तुलनेत दरामध्ये 300 रुपये वाढ झाली आहे. देशातील अन्य महानगरांतून दरात शंभर-दोनशे रुपयांचा फरक आहे. मात्र, चेन्‍नईत 24 कॅरेटचा भाव तोळ्यामागे 50 हजार 950 रुपये झाला आहे.