Sun, Aug 09, 2020 02:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोकूळ दूध महागले

गोकूळ दूध महागले

Last Updated: Jan 15 2020 2:05AM
नवी मुंबई : प्रतिनिधी 

मकरसंक्रांतीच्या पूर्व संध्येला गोकूळ दूध दोन रुपयांनी महाग होणार असल्याचे वृत्त आहे. गोकूळने गायीच्या दुधाचा खरेदी दर दोन रुपयांनी तर म्हशीच्या दुधाचा खरेदी दर 1.70 रुपयाने वाढवला असून हा बोजा ग्राहकांच्याच खिशातून वसूल केला जाणार आहे. परिणामी लिटरमागे दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय गोकूळने 1 फेब्रुवारीपासून अंमलात आणण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. सरत्या वर्षात कांदा, भाजीपाला, डाळी महागल्याने  गृहीणींचे बजेट कोलमडे. तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दुध लिटर मागे दोन रुपयांनी महागले होतो. नवीन वर्षात महागाईचा हा ससेमिरा सुरूच आहे.    

महागाईचे सत्र

गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत कांद्याचे दरवाढ झाल्याने लोकांनी कांदा खाणे सोडून दिले होते. थेट 150 रुपयांचा टप्पा कांद्याने गाठला होता. त्यात भाजीपाला अवकाळी पावसाने महाग झाल्याने भाज्यांचे दर किलोला 80 ते 120 रुपयांपर्यंत पोहचले होते. त्यात डिसेंबर अखेर डाळींची भर पडली. डाळींच्या  उत्पादनात घट झाल्याने त्याचा परिणाम आवक झाल्याने डाळी ही 10 ते 20 टक्क्यांनी महाग झाल्या. त्याचवेळी दुधाचे लिटर मागे दोन रूपये दरवाढ झाली होती.
पुन्हा दोन रुपये वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाशी (गोकुळ) संलग्‍न दूध उत्पादक शेतकर्‍यांना गाय व म्हैस दूध खरेदी दरामध्ये 1 फेब—ुवारी 2020 पासून दरवाढ करण्याचा निर्णय मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गायीच्या दूध खरेदी दरात दोन रुपये, तर म्हशीच्या दूध खरेदी दरात 1 रुपये 70 पैशांची वाढ होणार आहे. त्यामुळे महिन्याला साधारणत: अडीच कोटी रुपयांचा फायदा शेतकर्‍यांना होईल. त्यासोबतच दूधाचा विक्री दर सरासरी लिटरमागे दोन रुपये याप्रमाणे वाढवण्यात येणार आहे.

सर्वसाधारण महागाईचा उच्चांक

नवी दिल्ली : किरकोळ महागाई दरापाठोपाठ सर्वसामान्य महागाई दराचे आकडेदेखील चढे आले असून गेल्या डिसेंबर महिन्यात डब्ल्यूपीआय निर्देशांक 2.59 टक्के इतका नोंदविला गेला आहे. सर्वसाधारण महागाई दराची ही गेल्या सात महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. नोव्हेंबरमध्ये डब्ल्यूपीआय निर्देशांक 0.58 टक्के इतका नोंदविला गेला होता.

मागील काही महिन्यांत अन्‍नधान्य श्रेणीतील वस्तूंच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. त्याचा परिणाम महागाई दर वाढण्यात झाला आहे. सर्वसाधारण महागाई निर्देशांकात अन्‍नधान्य श्रेणीचा हिस्सा सुमारे 15 टक्के  इतका आहे.