Wed, Aug 12, 2020 12:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘आजारी, गर्भवतींना वर्क फ्रॉम होम द्या’

‘आजारी, गर्भवतींना वर्क फ्रॉम होम द्या’

Last Updated: Jul 05 2020 1:28AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित आजार, हृदयविकार, श्वसनविकार आदी आजार असलेल्या 50 वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी- कर्मचारी, गर्भवती कर्मचार्‍यांना कोरोनाचा धोका पाहता त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी. तसेच त्यांना ’वर्क फ्रॉम होम’ची मुभा द्यावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाने मंत्री ठाकूर यांना निवेदन दिले होते. त्यानुसार ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. खूपच अत्यावश्यक असेल तर या महिलांना त्यांच्या घराजवळच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करु देण्याच्या पर्यायावर विचार व्हावा असेही यापत्रात सुचवले आहे.