Thu, Aug 06, 2020 04:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...आणि 'त्या' गर्दुल्‍याला खांबावरून उतरवताना पोलिसांची दमछाक (video)

...आणि 'त्या' गर्दुल्‍याला खांबावरून उतरवताना पोलिसांची दमछाक (video)

Published On: Aug 14 2019 7:10PM | Last Updated: Aug 14 2019 8:04PM
ठाणे : प्रतिनिधी

ठाणे रेल्वे स्थानका जवळील किलोमीटर क्रमांक 32/20 येथील रेल्वेच्या ओव्हरहेड वायर्सच्या खांबावर एक गर्दुल्ला चढल्याने रेल्वे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. या गर्दुल्‍याला खाली उतरताना पोलिसांची मात्र दमछाक झाली.

या विषयी अधिक माहिती अशी की, 15 ऑगस्टच्या पूर्व संध्येला आज (बुधवार) ठाणे स्थानक येथे मंगल यादव (वय 20) हा गर्दुल्ला रेल्वेच्या ओव्हरहेड वायर्सच्या खांबांवर चढला होता. याची पोलिसांनी माहिती समजताच, पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. पोलिसांनी त्‍याला खाली येण्यास सांगितले, मात्र तो खाली येत नसल्‍याने पोलिस, अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी त्‍याला खाली उतरवले. या गोंधळामुळे अप आणि डाऊन मार्गवरील लोकल सेवा सुमारे अर्धा तास बंद ठेवण्यात आली होती. यामुळे ठाणे तसेच डाऊन मार्गावरील सर्व रेल्वे स्थनाकवर प्रवाशांची गर्दी झाली होती.