Mon, Nov 30, 2020 12:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपला सलग दुसऱ्या दिवशी भगदाड! सहयोगी आमदार आज शिवसेनेत प्रवेश करणार

भाजपला सलग दुसऱ्या दिवशी भगदाड! सहयोगी आमदार आज शिवसेनेत प्रवेश करणार

Last Updated: Oct 24 2020 7:18AM

आमदार गीता जैनठाणे : पुढारी वृत्तसेवा

दिग्गज नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज (दि.२३) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. याला काही तास उलटत नाहीत तोच  भाजपला दुसरा धक्का देण्याची तयारी शिवसेनेने केली. मीरा भाईंदर विधानसभेच्या भाजपच्या सहयोगी आमदार गीता जैन या शनिवारी दुपारी मातोश्रीवर शिवबंधन बांधणार आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करीत असल्याचे शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

शालेय शुल्कावरून दोन मंत्र्यांची दोन मते

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ भाजपमधील नाराज नेते कमळाचा त्याग करून इतर पक्षांत सन्मानपूर्वक स्थान शोधत आहेत. त्यात मिरा भाईंदरच्या भाजपच्या सहयोगी आमदार गीता जैन यांनी उडी मारण्याची तयारी केली आहे. माजी आमदार नरेंद्र मेहता आणि जैन यांच्यातील वाद जगजाहीर आहे. जैन या मिरा भाईंदर महापालिकेच्या महापौर असताना मेहता यांनी  त्यांना प्रचंड त्रास दिल्याने त्यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले होते.

मंत्रिमंडळात फेरबदल नाही : पवार

विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून गीता जैन यांनी भाजपला आव्हान दिले आणि विजय ही मिळविला. त्यानंतर जैन यांनी सहयोगी आमदार म्हणून भाजपशी जुळवून घेतले. मात्र मेहता आणि जैन यांच्यातील संबंध काही सुधारले नाही. आमदार गीता जैन या शिवसेनेच्या संपर्कात होत्या. कारण शिवसेनेने देखील त्यांना विजयासाठी मदत केली होती. राज्यात सत्तातंतर झाले आणि जैन यांच्या शिवसेना प्रवेशाची शक्यता अधिक बळावली होती.

दसर्‍याला सोन्याच्या झळाळीत वाढ

अखेर या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरल्याचे बोलले जाते. तशी माहिती सोशल मीडिया वर व्हायरल झाली आहे. या प्रवेशाबाबत शिवसेना प्रवक्ते आणि मिरा भाईंदर सहसंपर्कप्रमुख प्रताप सरनाईक म्हणाले की, मी त्यांचे पक्षात स्वागत करतो. शनिवारी दुपारी एक वाजता आमदार जैन यांचा मातोश्रीवर पक्ष प्रवेश होईल.