Tue, Aug 11, 2020 21:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खर्डी कसारा रेल्वे स्टेशनवर गॅस टँकर गळती

खर्डी कसारा रेल्वे स्टेशनवर गॅस टँकर गळती

Last Updated: Dec 14 2019 2:43PM

गळती झालेला गॅस टँकरकसारा : प्रतिनिधी

मुंबईहून कसाराकडे जाणारी मालगाडी गॅस टँकर घेऊन जात असताना ही गाडी खर्डी स्टेशनला उभी होती. अचानक सकाळी ८ च्या दरम्यान एका गॅस टँकरच्या झाकनामधून गॅस गळती सुरु झाली. यामुळे नागरिकांत घबराट निर्माण झाली.

प्रचंड गॅस गळतीचा उग्रवास येत असल्याने घटनास्थळाजवळ असलेल्या रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. सर्वत्र तपास केला असता खर्डी रेल्वे स्टेशन पुढे असलेल्या एका गॅस टँकर मालगाडीतून धूरा सारखी गॅस गळती सुरु होत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. तत्काळ या प्रकरणी स्टेशन मास्टर यांना माहिती देवून निदर्शनास आणले. याप्रकरणी तत्काळ संबंधित यंत्रणेला कळविण्यात आले. घटनास्थळी रेल्वे सुरक्षा अधिकारी हनुमान सिंग, तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, लोहमार्ग पोलिस अधिकारी शार्दूल, आपत्ती व्यवस्थापन टीम व पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. 

दरम्यान गॅस लीक असून देखील वाहतूक सुरु असल्याने धोका निर्माण होऊ शकतो. असे लक्षात येताच आपत्ती व्यवस्थापन टीमने रेल्वे अधिकारी व तहसीलदार यांना संपर्क करून वाहतूक बंद करण्याची विनंती केली. दुपारी १२ वाजुन ३० मीनिटांनी वाहतूक बंद करण्यात आली.