Tue, Aug 04, 2020 14:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गणेशोत्सवासाठी गाईडलाईन्स जाहीर; मंडळांना 'एवढ्याच' उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करता येणार!

गणेशोत्सवासाठी गाईडलाईन्स जाहीर; मंडळांना 'एवढ्याच' उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करता येणार!

Last Updated: Jul 11 2020 6:49PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यात कोरोना संकट अभूतपूर्व असतानाच सार्वजनिक गणेशोत्सवही तोंडावर आला आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारकडून गणेशोत्सवासाठी गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तींसाठी निर्देश घालून दिले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची गणेशमूर्ती जास्तीत जास्त चार फूट ठेवावी लागणार आहे. घरगुती गणेशाची उंची दोन फूट असावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.  मंडळांना महापालिका/स्थानिक प्रशासनाकडून धोरणानुसार पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.