Mon, May 25, 2020 22:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण : दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करताना ४ तरुण बुडाले

दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करताना ४ तरुण बुडाले

Last Updated: Oct 10 2019 1:49PM
टिटवाळा :  प्रतिनिधी

येथील येथील मांडा पश्चिम भागातील जानकी विद्यालय परिसरात असलेल्या ओमकारेश्वर सदन चाळ या ठिकाणी राहणारे चार तरुण दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना वाहून गेल्याची दुर्दैवी घटना काल (बुधवार दि. ९) रात्री १३ ते १२:३० च्या दरम्यान घडली. 

काल, बुधवारी रात्री १२ ते १२.३० च्या दरम्यान ओंकारेश्वर मित्र मंडळ हे आपल्या नवरात्रौउत्सवात बसवलेल्या दुर्गामातेच्या मुर्तीच्या विसर्जनासाठी येथील वासुंद्री जवळील काळु नदीत उतरले असताना पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मूर्ती त्यांच्या अंगावर आल्याने त्यांचा तोल गेला आणि ते चौघे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. रुपेश पवार (वय २३) , विश्वास पवार (२४) हे दोघे सख्ये भाऊ तसेच, सिद्धेश पार्टे (२४), सुमीत वायदंडे (२५ )अशी या चार युवकांची नावे आहेत.  

याबाबत तत्काळ टिटवाळा पोलीस यांना कळविण्यात आले. मध्यरात्री उशिरापर्यंत स्थानिक लोक व पोलीस यांचे शोधकार्य चालू होते. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. अग्निशमनदलाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि स्थानिक तरुण यांनी आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरूकेले आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.