Fri, Jul 10, 2020 00:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई : भाजपच्या चार नगरसेवकांचा राजीनामा

नवी मुंबई : भाजपच्या चार नगरसेवकांचा राजीनामा

Last Updated: Feb 18 2020 1:44AM
नवी मुंबई : पुढारी वृतसेवा 

भाजप नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांच्यासह अन्य तीन नगरसेवकांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने महापालिकेत चांगलेच राजकीय वातावरण गरम झाले होते. त्यानंतर आता या चारही नगरसेकांनी नगरसेवक पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे आज सोमवारी राजीनामा सुपूर्द केला. यावेळी विरोधी पक्षनेते विजय चौगुले उपस्थित होते. 

अधिक वाचा : 'इतिहास जपण्यापेक्षा, इतिहास घडविण्याच्या मागे लागा'

राजीनामा दिलेल्या नगरसेवकांमध्ये  ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी (प्रभाग क्रमांक ६८), नगरसेविका मुद्रिका गवळी (प्रभाग क्रमांक ७०), नगरसेविका संगीता वास्के (प्रभाग क्रमांक ६९) आणि नगरसेविका राधाताई कुलकर्णी (प्रभाग क्रमांक ७३) यांचा समावेश आहे.

अधिक वाचा : मुंबई : जीएसटी भवनला भीषण आग (video)