Fri, Nov 27, 2020 11:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह!

देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह!

Last Updated: Oct 24 2020 3:23PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आज (दि. २४) ट्विट करत फडणवीस यांनी करोना झाला असल्याची माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात दौरे करत होते. त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांना प्रभारीपदाची जबाबदारीही भाजपानं त्यांच्यावर सोपवलेली आहे, ते बिहारमध्येही ही सातत्यानं दौरे करत आहेत. 

फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलंय.

दरम्यान, राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड येथील आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनावर मात करून लवकर बरे व्हा असंही म्हटलंय.