Thu, Sep 24, 2020 16:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेकॉर्डब्रेक! सोन्याच्या दराने ओलांडली ५६ हजारांची पातळी

सोन्याच्या दराने ओलांडली ५६ हजारांची पातळी

Last Updated: Aug 07 2020 1:42PM

file photoनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

जागतिक आणि देशांतर्गत बाजारातील सोन्या-चांदीच्या दराची तेजी कायम असून एमसीएक्स वायदे बाजारात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने 56 हजार रुपयांची पातळी ओलांडली आहे. ऑक्टोबर डिलिव्हरी सोन्याचे प्रती 10 ग्रॅमचे दर शुक्रवारी सकाळी 300 रुपयांनी वाढून 56 हजार 143 रुपयांवर गेले. चांदीचे प्रतिकिलोचे दरही 1750 रुपयांनी वाढून 77 हजार 802 रुपयांवर गेले आहेत. 

वाचा : पैसे हडप करण्यासाठी रियाने सुशांतला ठरविले मनोरुग्ण; बिहार सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती

सोन्याच्या दरात गुरुवारी 720 रुपयांनी वाढ झाली होती, त्यापाठोपाठ सोने परत 300 रुपयांनी वाढले आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर चालूवर्षी तब्बल 44 टक्क्यांनी वाढले आहेत. जागतिक बाजारातही सोने दराचा दररोज नवा विक्रम होत आहे. प्रोत्साहन पॅकेजची शक्यता, अमेरिका-चीन यांच्या दरम्यानचा तणाव आदी कारणांमुळे सोने-चांदी व इतर धातूंच्या दरात जबरदस्त तेजी आली आहे. 

वाचा : नव्या भारताच्या पायाभरणीत शिक्षण धोरण महत्त्वाची भूमिका बजावेल- पंतप्रधान मोदी

जागतिक बाजारपेठेत सोन्याचे प्रती औंसचे दर 2070 डॉलर्सच्या आसपास स्थिर झाले आहेत. दुसरीकडे चांदीचे प्रती औंसचे दर 30 डॉलर्सवर गेले आहेत. अन्य चलनाच्या तुलनेत डॉलर कमजोर होत असल्याने देखील सोन्या-चांदीला मागणी आली आहे. जागतिक बाजारात चालू वर्षी सोन्याचे दर 35 टक्क्याने वाढले आहेत. येत्या दीड वर्षात सोन्याचे प्रति औंसचे दर तीन हजार डॉलर्सवर जाऊ शकतात, असा अंदाज बँक ऑफ अमेरिकेने वर्तवला आहे.
 

 "