पालघर : जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात ५ मुले बुडाली

Last Updated: Jul 02 2020 8:18PM
Responsive image


पालघर : पुढारी वृत्तसेवा

केळीचापाडा (काळशेती ) येथील काळमांडवी धबधब्यावर पोहायला गेलेल्या जव्हार येथील ५ मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.२ जुलै) दुपारी ३ च्या सुमारास घडली. पाच पैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. 

अधिक वाचा : 'कारागृहात आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करा'

जव्हार शहरातील अबिका चौक येथील १३ मुले काळमांडवी धबधब्यावर पोहण्यासाठी गेली होती. हा धबधबा खूप मोठा व खोल दरीत आहे. येथे पावसाळ्यात खाली उतरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते, यात तीन मोठ मोठे पाण्याचे डोह आहेत. पोहायला गेलेल्यांपैकी ५ मुलांना या पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. 

अधिक वाचा : सप्टेबरपर्यंत कोरोनाची साथ आटोक्यात येईल : डॉ. तात्याराव लहाने (video)

घटनास्थळी एनडीआरएफची टिमला पाचारण करण्यात आले आहे. पाच पैकी एका मुलाचा मृतदेह सापडला असून बाकीच्यांचा शोध चालू आहे. या घटनेची माहिती आमदार सुनील भुसारा यांनी दिली. जव्हारचे पोलिस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरु केला आहे.

अधिक वाचा : लालबाग राजाची यंदा प्रतिष्ठापना नाही; काय म्हणाले स्टार्स?