Tue, Jan 19, 2021 16:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांची ब्रेन ट्युमरशी झुंज

प्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांची ब्रेन ट्युमरशी झुंज

Published On: Jul 12 2019 2:09AM | Last Updated: Jul 12 2019 1:58AM
मुंबई : प्रतिनिधी

प्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘सुपर 30’ हा चित्रपट 12 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशनने आनंद यांची भूमिका साकारली आहे. मात्र आनंद कुमार हे ब्रेन ट्युमरशी झुंज देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

आनंद कुमार यांनीच त्यांच्या आजाराविषयी माध्यमांसमोर खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, ऐकण्याची क्षमता फार कमी झाल्याने तपासणीसाठी 2014 मध्ये दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात गेलो असता डॉक्टरांनी त्यांना ट्युमर असल्याचे सांगितले. मेंदूच्या नाजूक भागात हा ब्रेन ट्युमर असल्याने त्यावर शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. 

शस्त्रक्रिया केल्यास त्यांना अर्धांगवायू होऊन डोळ्यांनाही हानी पोहोचू शकतेे. अशी माहिती डॉक्टरांनी त्यांना दिली. सध्या त्यांच्यावर न्युरोसर्जन असलेले डॉ. बी. के. मिश्रा यांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.