Wed, Jul 15, 2020 22:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच

फडणवीस यांचा मुक्काम ‘वर्षा’वरच

Last Updated: Nov 18 2019 1:57AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने मंत्र्यांना आपले बंगले आणि कार्यालये खाली करण्याचे आदेेश देण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम आणखी तीन महिने वर्षा बंगल्यातच राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना बंगला खाली करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.  

अनेक मंत्र्यांनी आपल्या समानाची बांधाबांध सुरू केली आहे. मात्र, फडणवीस यांनी राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालीच पुन्हा सरकार येणार असल्याचे सांगितले आहे. सत्तास्थापनेची अनिश्चितता कायम असल्याने फडणवीस यांनी सध्या तरी वर्षावर राहण्याचे ठरविले आहे. मंत्र्यांना बंगले खाली करण्यासाठी प्रथम पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत संपल्यानंतर त्यांना तीन महिन्यांपर्यंत मुदतवाढ देता येते. मंत्र्यांची मंत्रालयातील कार्यालये बंद झाली आहेत. त्यांच्या अस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारीही आपल्या मूळ विभागात रुजू होत आहेत. मात्र, मंत्र्यांनी अजून बंगले सोडलेले नाहीत. त्यांना आत्ताच बंगले सोडू नका, अशा सूचनाही पक्षाकडून देण्यात आल्या आहेत.