Tue, Aug 04, 2020 14:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खोपोली : पोलाद कारखान्यात स्फोट, दोन कामगार ठार

खोपोली : पोलाद कारखान्यात स्फोट, दोन ठार

Last Updated: Jul 14 2020 2:29PM
खोपोली : प्रतिनिधी 

खोपोली शहरातील वस्तीला लागूनच असणाऱ्या पोलाद उत्पादन करणाऱ्या इंडिया स्टिल कारखान्यामध्ये काल (ता. १३) मध्यरात्री अचानक उत्पादन प्रक्रिया सुरू असताना स्फोट झाला. दरम्यान, या स्फोटात दोन कामगार जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तिसरा कामगारही गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरचे मयत झालेल्या कामगारांना नुकसान भरपाई दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक व कामगारांनी नकार दिला आहे. 

अधिक वाचा :  कोल्हापूर : वृद्ध दाम्पत्याची पेटवून घेऊन आत्महत्या

खोपोली शहरात सिद्धार्थ नगर मोहनवाडी विहिरीसह अन्य आदिवासी वाड्याना लागूनच पोलाद उत्पादन करणारी इंडिया स्टील कारखाना कार्यरत आहे. या कारखान्यात अनेक वेळा अशाच प्रकारे येथील व्यवस्थापनाच्या दुर्लक्ष पणामुळे अपघाताच्या घटना वारंवार घडल्या आहेत. 

अधिक वाचा : कोरेगाव भीमा प्रकरण : वरवरा राव रुग्णालयात दाखल

असाच प्रकार मध्यरात्री तिसऱ्या पाळीत कार्यरत असणाऱ्या विभागात अचानक स्फोट झाला. या ठिकाणी दिनेश वामनराव चव्हान (वय ५५), प्रमोद दूधनाथ शर्मा (वय ३०) दोघेही राहणार खोपोली ते जागीच ठार झाले. तर सुभाष धोंडीबा वांजळे (वय ५५) वरची खोपोली हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या स्फोटाचे कारण अद्याप समजले नाही.