Sun, Oct 25, 2020 07:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तारापूर मध्ये आरती ड्रग्ज कारखान्यात स्फोट

तारापूर मध्ये आरती ड्रग्ज कारखान्यात स्फोट

Last Updated: Sep 22 2020 11:59PM
बोईसर : पुढारी वृत्‍तसेवा 

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्ज कारखान्यात झालेल्या स्फोटात दोन कामगार जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री उत्पादन प्रक्रिया सुरू असताना झालेल्या स्फोटात या ठिकाणी आग लागली होती. कारखान्यातील कामगरांनी आगीवर नियंत्रण आणले आहे.

औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्ज प्लाँट नं. एन 198 या औषधाचा कच्चा माल बनविणाऱ्या कारखान्यात मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी रियाक्टर मध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू होती. यावेळी एका रियाक्टर मधून दुसऱ्या रियाक्टर मध्ये रासायनिक पदार्थ पाठवत असताना उलट्या हवेच्या दाबामुळे रियाक्टर जवळ असणाऱ्या यूग्लासचा रात्री 10:10 मिनिटांच्या  सुमारास स्फोट झाला. यावेळी त्या ठिकाणी असलेले ऑपरेटर प्रदीप पाटील व शांताराम जाधव हे जखमी झाले आहेत. 

विशेष म्हणजे या स्फोटाची कोणत्याही प्रकारची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाला देण्यात आली नसल्याचे उघड झाले आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.

 "