Sun, Aug 09, 2020 01:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › के. सी, एच. आर., जयहिंद कॉलेजची चौकशी

के. सी, एच. आर., जयहिंद कॉलेजची चौकशी

Published On: Jun 26 2019 1:45AM | Last Updated: Jun 26 2019 1:43AM
मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या 50 टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात अनियमितता झाली असल्यास चौकशी करु, असे शालेय शिक्षण मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मंगळवारी विधान परिषदेत जाहीर केले. 

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी मांडताना जयहिंद, के. सी आणि एच. आर. महाविद्यालयात अल्पसंख्याकांचा शिल्लक कोटा सरकारकडे वर्ग न करता शिक्षण उपसंचालकांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार करून भरल्याचा आरोप करीत या तिन्ही महाविद्यालयांतील गेल्या तीन वर्षांत झालेल्या प्रवेशाची आकडेवारीच त्यांनी पटलावर ठेवली. त्यावर शेलार यांनी चौकशीची मागणी मान्य केली.