Wed, Apr 01, 2020 23:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एयर आशियाच्या 'सीईओ'ला ईडीची नोटीस

एयर आशियाच्या 'सीईओ'ला ईडीची नोटीस

Last Updated: Jan 16 2020 4:27PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

भारतासह दक्षिण-पूर्व आशियातील प्रमुख विमान कंपनी ‘एयर आशिया’ च्या अधिकार्‍यांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीचा फास आवळला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टोनी फर्नांडिस यांना चौकशीसाठी 20 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले. कंपनीच्या इतर पाच बड्या अधिकार्‍यांनाही ईडीकडून समन्स पाठवण्यात आला आहे. 

अधिक वाचा : पीएमसी बँक घोटाळा : ईडी, आर्थिक गुन्हे शाखेची सर्वोच्च न्यायालयात धाव

एयर आशियाच्या सीईओवर मनी लाँन्ड्रिगचे आरोप करण्यात आले आहेत. फर्नांडिस यांच्या विरोधात मनी लाँन्ड्रिग प्रतिबंधक कायद्यांन्वे नोटीस बजावण्यात आले आहे. कंपनीचे समुह अध्यक्ष थरुमालिंगम, समूहाचे वरिष्ठ अधिकारी एस रामादोरई यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. विमान कंपनीचे माजी सीईओ नरेश अल्गन तसेच मूथ्थू चंडिल्य, अरूण भाटिया यांना ही 20 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडी ने दिले आहेत. 

अधिक वाचा : फास्टॅगवर पहिल्याच दिवशी ‘संक्रांत’!

एयर आशिया ने काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या कार्यकाळात नियमात बदल करून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा अधिकार प्राप्त करण्यासाठी कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी ईडीने सिंगापूर मधील एका संस्थेच्या बँक व्यवहाराची तपासणी केली आहे. आर्थिक व्यवहारासाठी स्थापन करण्यात आलेल्या देशातील इतर खोटया कंपनींची ही तपासणी केली जात आहे. कंपनीने फायद्यासाठी सरकारी निमयांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. कंपनीने त्यासाठी अनेक नेत्यांसह अधिकार्‍यांना लाच दिली, असा ठपका विमान कंपनीवर ठेवण्यात आला आहे.

अधिक वाचा : निर्भया : दिल्ली सरकारने फेटाळली दोषीची दया याचिका