Fri, Nov 27, 2020 10:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › १०१ तृतीयपंथियांच्या ओट्या भरून दसरा साजरा

ठाणे : १०१ तृतीयपंथियांच्या ओट्या भरून दसरा साजरा

Last Updated: Oct 25 2020 1:33AM
ठाणे : पुढारी वृत्तसेवा

अनोखे उपक्रम करून सामाजिक बांधिलकी जपणारी ठाण्यातील ऋणानुबंध महिला मंडळाने ठाण्यातील १०१ तृतीयपंथियांच्या आज ओट्या भरून अनोख्या पद्धतीने नारी शक्तीचा गजर करीत दसरा साजरा केला.

ऋणानुबंध महिला मंडळाच्या अध्यक्षा तेजल सोपारकर यांनी तृतीयपंथीय नारी शक्तीला सलाम करण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन करीत १०१ ओट्या जमा केल्या. विविध स्तरातील महिलांनी आपआपल्या ओट्या एकत्रित जमा केल्या. त्या ओट्या ठाण्यातील यल्लमा देवीच्या चरणी अर्पण करण्यात आल्या.

कोरोना, सोशल डिस्टन्सिंगमुळे १०१ तृतीयपंथियांना एकत्रित बोलावण्यात आले नाही. काही निवडक जणींच्या उपस्थितीत ओट्या भरून देशावरील कोरोनाचे संकट दूर करण्याचे गार्‍हाणे आई यल्लमा देवीकडे घालण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षा तेजल सोपारकर यांच्या नेतृत्वाखाली जागृती जाधव, गीता भालेराव, भारती बदाणे, योगिता अत्रे, प्रीतम कदम यांनी आई यल्लमा देवीच्या मदिराच्या ट्रस्टी कामिनी ताई, वैशू, सोनू, भावना, लकी यांच्यासह अन्य तृतीयपंथियांच्या ओट्या भरल्या आणि अनोख्या पद्धतीने दसरा साजरा करण्यात आला.  

वाचा : सुप्रिया सुळेंच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची अपूर्ण माहिती?; निवडणूक आयोगाकडून चौकशी

वाचा :ITR भरण्याची तारीख पुन्हा वाढवली! जाणून घ्या शेवटची तारीख