Sun, Oct 25, 2020 08:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘कोलकाता नाईट रायडर्स’च्या पार्टीत ड्रग्जची लयलूट 

‘कोलकाता नाईट रायडर्स’च्या पार्टीत ड्रग्जची लयलूट 

Last Updated: Sep 25 2020 1:51AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

‘कोलकाता नाईट रायडर्स’ या ‘आयपीएल’ क्रिकेट संघाची पार्टी ही रेव्ह पार्टीच असते. या पार्टीत सर्रास ड्रग्ज घेतले जाते. स्टार्स व क्रिकेटर्सच्या पत्नी ड्रग्ज घेतात. किंग खान (शाहरुख खान) कसा आहे हे कुणाकडूनही लपलेले नाही, असा खळबळजनक आरोप अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने केला आहे. ड्रग्ज घेणार्‍यांची नावे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (अमली पदार्थविरोधी विभाग, एनसीबी) देण्याची तयारीही या अभिनेत्रीने दर्शविली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या या मुलाखतीत शर्लिनने शाहरुख खानसह अभिनेत्री दीपिका पदुकोण, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि क्‍वान कंपनीच्या मालकावरही आरोप केले. तिने सांगितले की, मी ‘केकेआर’च्या (कोलकाता नाईट रायडर्स) सामन्यासाठी कोलकाता येथे गेले होते.

केकेआरने ईडन गार्डन स्टेडियममध्ये झालेला सामना जिंकल्यानंतर कोलकात्यामध्ये एका पार्टीचे आयोजन केले होते. अली मुरानी यांनी बोलवलेल्या या पार्टीमध्ये क्रिकेटपटू, फिल्म स्टार्स, त्यांच्या प्रेयसी, पत्नी असे अनेकजण हजर होते. प्रत्येकजण वेगवेगळ्या अमली पदार्थांचे सेवन करत होता. त्यानंतर फ्रेश होण्यासाठी शर्लिन पार्टी हॉलच्या बाथरूममध्ये गेली असता तिथे बॉलीवूड स्टार्सच्या पत्नी पांढरी पावडर सेवन करताना दिसल्याचे तिने सांगितले.

राम गोपाल वर्मा एक ड्रग अ‍ॅडिक्ट आहे, दीपिका पदुकोण चाहत्यांना, तरुणांना फसवत आहे. इंडस्ट्रीत कोणकोणत्या अमली पदार्थांची खरेदी कोण करतो, किती घेतो, कधी घेतो ही सगळी माहिती इनसाईडर्सना असल्याचे तिने उघड केले.

इंडस्ट्रीत स्वतःच्या घरी मोठ्या पार्ट्या देणारे स्टार्स पार्ट्यांमध्ये फक्‍त अमली पदार्थांच्या व्हरायटी समोर ठेवतात आणि अमली पदार्थांचे सेवन न करणार्‍याची कशी टर उडवतात हे तिने सांगितले.

 "