किरकोळ बाजारात मसाल्याचे दर दुप्पट

Last Updated: Dec 15 2019 1:08AM
Responsive image


नवी मुंबई : प्रतिनिधी

एकीकडे कांद्याचे दर आटोक्यात येण्यास सुरुवात होत नाही, तोच डिसेंबरच्या सुरुवातीपासून मसाल्याच्या पदार्थांसह गुळ, साखर, तीळ, सुंठ, धणे, हळकुंड, हळद पावडर, जिरे, मेथी, मोरी, दालचीनी, जायफळ, लाल मिरची,काळीमीरीचे दर एपीएमसीच्या घाऊक बाजारापेक्षा दुप्पट झाले आहेत. 

एपीएमसी घाऊक बाजारपेठेत सप्टेंबरपासून डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत दर स्थिर असताना ही किरकोळ बाजारात मात्र दरवाढ होताना दिसते. त्यामध्ये प्रामुख्याने मसाले पदार्थ चांगलेच तेजीत आहेत. घाऊक बाजारात लाल मिरची 90 ते 190 रुपये किलो असून किरकोळ बाजारात हीच लाल मिरची 220 ते 300 रुपये किलो आहे. तर  काळीमिरीचे  घाऊकमध्ये 330 ते 450 रुपये किलो असून किरकोळ बाजारात 400 ते 800 रुपयांपर्यंत तर सुंठ ही किरकोळ बाजारात 300 ते 600 रुपये किलो झाले आहे. जीरे 400 ते 800 रुपये किलो किरकोळ बाजारात असून घाऊक मध्ये 200 ते 550 रुपये किलो आहे. किरकोळ बाजारातील हे मसाले पदार्थ तेजीत असतानाच त्यात आटा, नारळ, तुप, साखर, गुळ, मेथी, खसखस, मोरी, तीळ, कोकम,जर्दाळू, किशमिशसह सुकामेवाचे पदार्थही महागले आहेत. साखर घाऊकमध्ये 32 ते 35 रुपये असताना किरकोळ बाजारात 38 ते 40 रुपयांवर पोहचली आहे. आटा 24 ते 27 रुपये किलो असताना किरकोळ बाजारात 36 ते 50 रुपये किलो आहे. 

एपीएमसी मसाला बाजारात नोव्हेंबर महिन्यापासून सुकलेल्या लाल मिरचीची आवक वाढायला सुरुवात होते मात्र यावर्षी डिसेंबर महिना सुरू होऊनही मसाल्याच्या लाल मिरच्यांची आवक वाढलेली नाही.  पावसामुळे मिरचीचे उत्पादन कमी झाले आहे. यंदा पावसामुळे मिरची भिजल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे.

पावसाळ्यानंतर वर्षभर पुरेल असा लाल मसाला बनवण्याची लगबगही सुरू होते. यासाठी नोव्हेंबरपासून सुकलेल्या लाल मिरच्यांची आवक सुरू होते. कर्नाटक, बेंगळुरू, आंध्रप्रदेशामधून मोठ्या प्रमाणात मिरची बाजारात येते. यामध्ये लवंगी, पांडी, बेडगी आणि काश्मिरी मिरचीचा समावेश असतो. नोव्हेंबरपर्यत सुकलेल्या लाल मिरचीच्या दोन तीन गाड्या बाजारात येतात. नोव्हेंबरनंतर मिरचीची आवक वाढते. दररोज किमान 10 ते 12 गाड्या येतात. त्यानंतर हळूहळू ही आवक 20 ते 25 आणि एप्रिल, मेपर्यंत 50 ते 60  गाड्यांवर जाते. यावर्षी चित्र उलट आहे. डिसेंबर महिना सुरु झाला तरी  तरी मिरचीची आवक वाढलेली नाही. पाच  ते सहा गाड्या लाल मिरची बाजारात येत आहे. ज्या ज्या ठिकाणी मिरचीचे अधिक उत्पादन होते, त्या कोल्हापूर, कर्नाटक येथे यंदा पावसाने थैमान घातल्याने मिरचीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले.  त्यामुळे बाजारात सुकलेल्या लाल मिरच्यांची कमतरता निर्माण झाली आहे.  बाजारात मद्रास मिरची व संकेश्वरी मिरची फेबु्रवारीत दाखल होतील. मिरची दर वाढ झाली असली तरी मिरची पावडर बनवण्यासाठी लागण्यात येणार्‍या साहित्यांच्या दरात वाढ झाली नसल्याने गृहिणीना दिलासा मिळला आहे. 

चेकनाक्यात ट्रक घुसला; ट्रकखाली सापडलेले पोलिस कर्मचारी सुदैवाने बचावले


अजितदादांना मुख्यमंत्रीपदी बघायचं आहे; रक्षाबंधन दिनी ताईंची इच्छा


राममंदिर भूमीपूजनाचं पहिलं निमंत्रण इकबाल अंसारींना!


सुशांत मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा


वाळवा पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव


पैसा, राजकारणाच्या जोरावर हिंदूंना धडा शिकवायचा होता; ताहीर हुसैनची धक्कादायक कबुली


मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने : अनिल देशमुख


सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन महाराष्ट्र, बिहारमध्ये राजकीय संघर्ष


राम मंदिर भूमिपूजनापासून उमा भारती राहणार दूर; 'हे' आहे कारण!


अयोध्येत राम मंदिराची प्रतिकृती असलेल्या रेल्वे स्थानकाची उभारणी