Mon, Sep 28, 2020 13:54



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप नगरसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

भाजप नगरसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Published On: Jan 13 2018 1:13AM | Last Updated: Jan 13 2018 1:09AM

बुकमार्क करा




डोंबिवली : वार्ताहर

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्र. 108 चे भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येसाठी 1 कोटीची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली डोंबिवलीतील भाजपाचे नगरसेवक नगरसेवक महेश पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. कुणाल पाटील यांची हत्या करण्यासाठी आपल्याला एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असून 11 लाख रुपये अ‍ॅडव्हान्सही घेतल्याची कबुली अटकेतील एका आरोपीने दिली होती. पोलिसांचा तपास सुरू असतानाच गणेशपुरी पोलीस ठाण्यात नगरसेवक महेश पाटील, सुजित नलावडे यांच्यासह इतर 11 जणांवर ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला.

एकूण 6 जणांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने भिवंडी-वाडा रोडवरील सशस्त्र दरोडा प्रकरणात अटक केली होती. त्यांच्याकडून 1 पिस्तुल, 1 रिव्हॉल्व्हर, 2 गावठी कट्टे, 16 जिवंत काडतुसे यासह 3 लाख 40 हजारांची रोकडही पोलिसांनी जप्त केली. तर नगरसेवक महेश पाटील, सुजित नलावडे आणि विजय बाकाडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज सादर केला. या अर्जावर शुक्रवारी अंतरिम सुनावणी झाली. शस्त्रसाठा हस्तगत करणे बाकी आहे. तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे आरोपींना जामीन देऊ नये, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली. यावर जिल्हा सत्र न्यायाधीश एन. एम. वाघमारे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.