Tue, Mar 09, 2021 16:17
कल्याण : नव्याने उभारण्यात आलेल्या पत्रीपुलाच्या नामकरणावरून सेना-भाजपमध्ये वाद  

Last Updated: Jan 25 2021 3:02PM
कल्याण : पुढारी वृत्तसेवा

कल्याणातील बहुचर्चित नव्याने उभारण्यात आलेला पत्री पूल तब्बल दोन वर्ष तीन महिन्याच्या अथक प्रयत्नाने पूर्णत्वास आला आहे. या पुलाच्या लोकार्पण शीलेचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. हा पूल नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा - मुंबई : आझाद मैदानातील शेतकऱ्यांच्या मोर्चाकडे शिवसेनेने पाठ फिरवली! 

शिवसेनेकडून ग्रामदैवत आई तिसाई देवी उड्डाण पूल हे नाव दिले तर भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी या नव्या पत्री पुलाचे नाव भारतरत्न माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ डॉ.ए.पी .जे .कलाम हे नाव द्यावं असे पत्र दिले आहे. या नावाला भाजप खासदार कपिल पाटील यांनी अनुमोदन द्यावं व या नावाचा विचार करावा, अशी मागणी कार्यक्रमादरम्यान केली.