Fri, Apr 23, 2021 14:25
भाजपला धक्का; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त

Last Updated: Apr 08 2021 1:25PM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यात आली आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे या समितीवर भाजपचे वर्चस्व होते. विद्यमान अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह सहा सदस्य पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर होते. आता ही समितीच बरखास्त करण्यात आली आहे. यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.

वाचा : ‘ट्रकभर पुरावे’, ‘पाठीत खंजीर’ ते... शरद पवारांवरील आरोपांचे पुढे काय झाले?

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर भाजपचे वर्चस्व होते. महेश जाधव या समितीचे अध्यक्ष होते. जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ही समितीच बरखास्त करुन महाविकास आघाडीने भाजपला दणका दिल्याची चर्चा सुरु आहे.

वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोनावरील लसीचा दुसरा डोस 

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यासाठी हालचाली सुरु होत्या. अखेर  विधी व न्याय विभागाने याबाबत निर्णय जारी केला आहे. या समितीचा कार्यभार एक वर्षासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आला आहे.

वाचा : कोरोनाची परिस्थिती गंभीर; धैर्याने सामोरे जावू; शरद पवार यांनी केले आवाहन 

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित करवीर निवासिनी अंबाबाई, श्री जोतिबा ही प्रमुख मंदिरे येतात. तसेच या समितीच्या अखत्यारित कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सुमारे ३०४२ मंदिरांचा समावेश आहे. 

वाचा : 'वाझेच पत्र गंभीर, सत्य बाहेर आले पाहिजे'