Tue, Oct 20, 2020 10:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांच्यात मराठा आंदोलनासह अन्य मुद्द्यांवर चर्चा 

मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांच्यात मराठा आंदोलनासह अन्य मुद्द्यांवर चर्चा 

Last Updated: Sep 20 2020 1:39AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीमुळे राज्यभर मराठा समाज आंदोलन करत असताना  निर्माण झालेल्या परिस्थितीवर तसेच राज्यासमोरील अन्य प्रश्नांवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वर्षा वा निवासस्थानी सुमारे पाऊण तास चर्चा झाली. 

यावेळी शरद पवार यांनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ ज्या घाईने आयोजित केला त्याबाबत या चर्चेत नाराजी व्यक्त केल्याचे समजते.मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीवर बोलताना शरद पवार यांनी हे आरक्षण पुर्ववत सुरू ठेवण्यासाठी अध्यादेशाचा पर्याय मांडला होता. तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत अध्यादेश काढणे, स्थगितीवर फेरविचार याचिका दाखल करणष तसेच घटनापीठासाठी आग्रह धरणे या तीन मुद्दायवर चर्चा झाली होती. शनिवारच्या ठाकरे पवार चर्चेतही या मुद्दांवर चर्चा झाल्याचे समजते.

मराठा समाज या स्थगितीच्या निर्णयानंतर आक्रमक झाला असून रववारीच मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन होत आहे. तर राज्यभर  ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. आंदोलनाच्या माध्यमातुन जी परिस्थीती राज्यात तयार होणार आहे त्याचाही आढावा  या चर्चेत घेण्यात आल्याचे समजते. तसेच याबाबत काय करता येईल यावरही चर्चा झाली.

इंदू मिलमध्ये जो कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. त्याबाबत फारशी कोणाला कल्पना देण्यात आली नव्हती. त्यातुन नवा वाद सुरू झाल्यानंतर हा कार्यक्मच स्थगित करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. तसेच शिवसेनेची या माध्यमातुन श्रेयासाठी धडपड सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. या सगळ्या प्रकाराबद्दल शरद पवार यांनी या चर्चेत नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत .त्याचबरोबर  आता मराठा समाजाचे आंदोलनही सुरू झाले आहे. त्यामुळे निर्माण होणार्‍या परिस्थीतीवरही चर्चा करण्यात आली. वाढणारी रूग्णसंख्या व आंदोलनाने त्यामध्ये पडण्याची संभाव्य भर याबाबतही विचार करण्यात आला.

केंद्र सरकारने कांदा नियाीवर बंदी घातल्याने शेतकर्‍यांचे फार मोठे नचकसान होणार आहे. शेतकर्‍यांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याने याबाबत केंद्राकडष आग्रही भुमिका मांडण्याबाबतही चर्चा झाली. तसेच राज्यातील  वरिष्ठ सनदी  व पोलिस अधिकार्‍यांच्या  बदल्यांवरही चर्चा झाल्याचे समजते. पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांवरून राष्ट्रवादी व शिवसेनेत खटका उडला होता. 

 "