कोरोना लसीकरण I आपला नाकर्तेपणा लपवायचा आणि केंद्राला बोलायचे ही राज्य सरकारची पद्धत : देवेंद्र फडणवीस

Last Updated: Jan 13 2021 4:54PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले असल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. या आरोपांना आता  विरोधी  पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.  आपला नाकर्तेपणा लपवायचा आणि केंद्राला बोलायचे ही राज्य सरकारची पद्धत असल्याची टीका त्यांनी केली आहे. आरोप लागण्याची यांना सवय लागली आहे. प्रोटोकॉलनुसार लसीचे वाटप झाल्याचे फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis hit out thackeray government over corona vaccination distribution) 

अधिक वाचा : महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले : आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यासह देशभरात कोरोनाच्या लसीकरणाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सरकारच्या कोरोना लसीकरणावर आक्षेप घेत टीका केली आहे. महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले असल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला.  ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते यावेळी त्यानी केंद्र सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे. 

अधिक वाचा : धनंजय मुंडेंवर कारवाई होऊ शकते का? कायदेशीर प्रक्रिया काय सांगते

महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्र सरकारकडून एकूण ९ लाख ७३ हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. बफर स्टॉकसहित राज्याच्या वाट्याला सतरा ते साडे सतरा लाख डोसची गरज आहे. सध्या ९ ते ९.५ लाख आपल्याकडे आले आहेत. याचा अर्थ ते कमी आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ज्या व्यक्तीला तुम्ही डोस देत आहात, त्या व्यक्तिला पूर्ण डोस द्या अशा सुचना आहेत. परंतु अपेक्षेच्या तुलनेच ५५ टक्के डोस आलेले आहेत. त्यामुळे ८ लाख नागरिकांचे लसीकरण करायचे असताना आम्हाला ५५ टक्के म्हणजेच साधारण ५ लाखांपर्यंत लसीकरण पूर्ण करणार असल्याची माहीती माहिती मंत्री टोपे यांनी दिली.

अधिक वाचा : गणेश नाईक -मंदा म्हात्रेंचे शीतयुद्ध थांबणार? आशीष शेलार नवी मुंबईत

राज्यात कोरोनाचे लसीकरणाची तयारी सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्रात १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात होत आहे. यावर मंत्री टोपे म्हणाले की, ८ लाख लोकांना कोरोनाची लस मिळेल अशी अपेक्षा होती परंतु त्याच्या तुलनेत लस कमी आली आहे. जी लस आलेली आहे ती आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये पोहोचेल. त्याचसोबत अनेक जिल्ह्यांमध्ये आज रात्री तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या लस पोहोचेल असे मंत्री टोपे यांनी सांगितले.

अधिक वाचा : धनंजय मुंडे यांना द्विभार्या प्रतिबंधक कायदा का लागू होत नाही?