Mon, Dec 16, 2019 11:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भांडणात दोन्ही बाजूंचे नुकसान

भांडणात दोन्ही बाजूंचे नुकसान

Last Updated: Nov 20 2019 1:28AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी
आपसात भांडल्याने दोघांचेही नुकसान होते हे माहिती असून देखील काहीजण भांडतात, अशा  शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. त्यांच्या या विधानाने युतीतील राजकीय संघर्षावर सरसंघचालकांनी आपली अप्रत्यक्ष नाराजीच प्रकट केल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा-शिवसेना या 30 वर्षांपासून एकत्र असलेल्या मित्रपक्षात मुख्यमंत्रीपदावरुन संघर्ष निर्माण झाला आहे. या संघर्षातून ही युती तुटली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना खडे बोल सुनावले आहेत.

आपल्या स्वार्थाला खूप कमीजण तिलांजली देतात. देशांचे उदाहरण घ्या किंवा व्यक्तींचे. माणसाला हे देखील माहिती आहे की निसर्गाला नष्ट केल्याने आपलाही विनाश होणार आहे. मात्र, निसर्गाला नष्ट करण्याचे कार्य अद्यापही थांबलेले नाही. आपसात भांडण केल्याने दोघांचेही नुकसान होते. तरीदेखील आपसातील भांडणे अद्यापही बंद झालेली नाहीत, असे सरसंघचालक म्हणाले.