Thu, Sep 24, 2020 16:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डी. एस. कुलकर्णी यांना केव्हाही अटक

डी. एस. कुलकर्णी यांना केव्हाही अटक

Published On: Dec 20 2017 2:07AM | Last Updated: Dec 20 2017 2:07AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी 50 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याची लेखी हमी देणारे पुण्याचे बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

न्या. गडकरी यांनी 19 डिसेंबरपर्यंत ठेवीदारांचे 50 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याची शेवटची संधी डी. एस. कुलकर्णी यांना दिली होती. अन्यथा जामीन रद्द होईल असेही स्पष्ट केले होते. या आदेशात न्या. साधना जाधव यांनी मंगळवारी यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. ठेवीदारांचे सुमारे 200 कोटी रुपयांच्या ठेवी परत न केल्याने पुणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी वादाच्या भोवर्‍यात अडकले. पुणे जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर  त्यांच्यावतीने अ‍ॅड. मनोज मोहिते यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.