Wed, Dec 11, 2019 19:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : सुटकेसमध्ये सापडले कापलेले हात-पाय

मुंबई : सुटकेसमध्ये सापडले कापलेले हात-पाय

Last Updated: Dec 03 2019 12:42PM

माहीम किनाऱ्यावर सापडलेली सुटकेस.मुंबई : पुढारी ऑनलाईन

मृतदेहाचे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले असल्याचा खळबळजनक प्रकार माहीममध्ये समोर आला आहे. सोमवारी सकाळची ही घटना आहे. सुटकेसमधील मृतदेह पुरुषाचा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

माहीम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल, सोमवारी ६.४० वाजण्याच्या सुमारास माहीममधील मगदूम शहा बाबा दर्गाच्या पाठीमागे, समुद्र किनारी एक पांढऱ्या काळ्या रंगाची अमेरिकन टुरिस्टर कंपनीची सुटकेस पाण्यावर तरंगताना मिळाली. त्यात मानवी शरीराचा खांद्यापासून कापलेला डावा हात व गुडघ्यापासून खाली कापलेल्या अवस्थेतील उजवा पाय पंज्यासह, तसेच काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत कापलेले पुरुषाचे गुप्तांग मिळून आले आहे. सदरचे अवयव सायन हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहेत. 

या घटनेबाबत माहीम पोलिस अधिक तपास माहीम पोलीस करीत आहे.