मोडकळीस आलेल्या सर्व इमारतींसाठी तत्काळ कृती आराखडा तयार करा!

Last Updated: Sep 22 2020 1:19AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मृतांच्या कुटुंबीयांना केवळ 5 लाख, 10 लाख रुपये देऊन गेलेले जीव परत येणार नाहीत. अशा मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी दीर्घकालीन उपाययोजना व सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी केली.

सोमवारी पहाटे भिवंडीत  तीन मजली इमारत कोसळल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. भिवंडी महापालिकेचे आयुक्‍त डॉ. पंकज आशिया यांनी त्यांना मदत व सुटका कार्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात जाऊन दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार महेश चौगुले, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवी सावंत, राजू  गाजेंगी, विशाल पाठारे, माजी सरचिटणीस प्रेषित जयवंत,जिल्हा सचिव निलेश कोंडलेकर, आरपीआय अध्यक्ष महेद्र गायकवाड, पूर्व मंडल अध्यक्ष मारुती देशमुख, बालकिशन कल्याडप, भूमेश कल्याडप, लकी भाई आदी उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, वर्षानुवर्षे जुन्या इमारतीत राहणार्‍या लोकांना केवळ नोटिसा पाठवून महानगरपालिका जबाबदारी झटकते. लोकांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था मात्र करत नाही. अशी व्यवस्था केली तर असे बळी जाणार नाहीत. सोमवारी पहाटे कोसळलेल्या या इमारतीलाही नोटीस धाडण्यात आली होती. पण राहते घर सोडले तर पर्यायी व्यवस्था होईल की नाही या विचाराने मेलो तरी चालेल पण याच घरात राहू, या विचाराने लोक इमारतीतच राहिले. नोटीस पाठवूनही घरे खाली झाली नाहीत. भिवंडी महानगरपालिका आयुक्तांना विनंती करून अशा इमारतीबाबत अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून शासनाला पाठविल्यास आम्ही त्याचा  आम्ही पाठपुरावा करू असेही त्यांनी स्पष्ट केले.

भिवंडीमध्ये अशा शेकडो इमारती आहेत ज्यांना तात्काळ डागडुजीची गरज आहे. 
मागच्या महिन्यात फोर्टमध्ये जेव्हा इमारत पडली होती तेव्हा युद्ध पातळीवर धोकादायक इमारतीचे ऑडिट करून  धोकादायक इमारतीमधील लोकांसाठी पर्यायी व्यवस्था  करून त्यांच्यासाठी पुनर्विकासाच्या योजना तयार करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. शासन जागचे हलले नाही. 
धोकादायक इमारतीचा मुद्दा मुंबई, ठाणे, भिवंडीपुरता मर्यादित नसून तालुका स्तरावर इमारतींच्या डागडुजीची आवश्यकता आहे. या इमारती कुठल्याही क्षणी कोसळतील अशा अवस्थेत आहेत. 

पुण्यात वकिलाचा खून : शेंडे मास्टरमाईंड; दृश्यम स्टाईलनं रचला कट


आयपीएलमध्ये कॅमेऱ्यात टिपलेली ती 'मिस्ट्री गर्ल' आहे तरी कोण?


'सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर' 


कोल्हापूर : राजाराम बंधारा येथे पोहण्यासाठी गेलेला मुलगा बुडाला, एकाला वाचविण्यात यश


पोलिसाचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, वाचवण्यासाठी गेलेला दुसरा पोलिसही जखमी


मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना दिलासा नाहीच - फडणवीस


'या' डॉक्टराचा भन्नाट डान्स पाहिला का? ऋतिक रोशननेही घेतली दखल (Video)


मोठा दिलासा! देशात फेब्रुवारीपर्यंत राहणार कोरोनाचे केवळ ४० हजार रुग्ण


कोरोनामुळे जवळचा मित्र गमवल्याने मास्टर ब्लास्टर भावूक


IPL 2020 : धोनीचा 'तो' एक हाती झेल होतोय व्हायरल (See Video)