Sun, Feb 28, 2021 06:44
ग्रामपंचायत निवडणूक LIVE : पुन्हा चित्र पालटले; भाजप आघाडीवर, शिवसेना द्वितीय स्थानावर!

Last Updated: Jan 18 2021 7:33PM

file photoपुढारी ऑनलाईन डेस्क

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आणि नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या राज्यातील राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज, सोमवारी होत आहे. राज्यातील एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. (Counting of votes for Gram Panchayat elections in the maharashtra today)

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा (Gram Panchayat elections) कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यातील १५२३ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत गावांत सत्ता कोणाची, हे स्पष्ट होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींच्या ३ हजार २६७ जागांसाठी ८ हजार ५१६ उमेदवार नशीब आजमावत आहेत.

सांगली जिल्ह्यात १४२ ग्रामपंचायतींमधील ५५१ प्रभागांमधील १ हजार ५०८ जागांसाठी ५ हजार ६५ उमेदवार मैदानात आहेत. निकाल काय लागणार, सत्ता येणार की परिवर्तन होणार या विचाराने नेते आणि उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे.  सातारा जिल्ह्यातील ८७९ गावांत ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी २२१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ९० टक्के मतदान झाले होते. त्यांचा निकाल आज जाहीर होणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी अपवाद वगळता अत्यंत चुरशीने झालेल्या मतदान प्रक्रियेत मतदानाची टक्केवारी ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. ४ हजार ९४० ग्रामपंचायत सदस्यांसाठी मतदारांनी दिलेला कौल आज स्पष्ट होणार आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. ग्रामीण भागातील जनता, राजकीय पदाधिकारी यांना निकालाची उत्सुकता लागू राहिली असून निकालानंतर गुलाल कोण उधळणार, हे निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. 

लाईव्ह अपडेट्स....

आतापर्यंत १० हजार ४२२ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर (संध्याकाळी ७ पर्यंत)

भाजप २ हजार ३६५ 

शिवसेना २ हजार १९० 

राष्ट्रवादी २ हजार १०१ 

काँग्रेस १ हजार ५४५ 

मनसे ३६ 

स्थानिक २ हजार १८५  

राज्यातील महत्त्वाचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायतीवर दिवंगत आमदार भारत भालके गटाचे वर्चस्व

तासगाव तालुक्यात ‘राष्ट्रवादी पुन्हा’!

ग्रामपंचायत निवडणूक निकाल : बारामतीत राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

हमीदवाडा पंचक्रोशीत चर्चा 'बाबू'च्या विजयाची!

 कोल्हापूर : तेरवाड, बस्तवाड, टाकळीवाडी, घोसरवाडात सत्ताबदल

 सांगली : खानापूर तालुक्यात शिवसेनेचा भगवा!

मंत्री जयंत पाटलांच्या सासरवाडीत भाजपचा झेंडा!

कडेगाव तालुक्यात काँग्रेसचा विजय

सांगली- आमदार सुमनताई पाटील यांनी माहेरातही राखला राष्ट्रवादीचा गड 

पृथ्वीराज चव्हाणांना कृष्णाकाठ गावांमध्ये धक्का

राळेगणसिद्धी : अण्णा हजारेंच्या निकटवर्तीयांनी सत्ता राखली

राधाकृष्ण विखे-पाटलांनी लोणी खुर्दमधील २० वर्षांची सत्ता गमावली!

राम शिंदेंना रोहित पवारांकडून चौंडीमध्ये धोबीपछाड

हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांची एकहाती सत्ता, सात जागांवर दणदणीत विजय

'कोकणात शिवसेना सपशेल फेल, पंतप्रधान मोदींच्या कृषी कायद्यांमुळे भाजपचा विजय'

वैभववाडी तालुक्यात नितेश राणेंना धक्का

नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची सरशी

जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भाजपचाच झेंडा : गिरीष महाजन 

जळगावात तृतीयपंथी अंजली पाटील विजयी; न्यायालयाने परवानगी दिली अन्‌  विजय खेचून आणला!

पाटोद्यात पेरे पाटलांना धक्का, कन्येचा पराभव

राणाजगजितसिंह पाटील गटाला धक्का

नांदेड : पॅनेल जिंकले पण पॅनेल प्रमुख पराभूत

शिवसेनेची ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी घौडदौड 

राष्ट्रवादी काँग्रेस द्वितीय स्थानावर, भाजप तिसऱ्या स्थानावर, काँग्रेस चौथ्या स्थानावर 

मनसेची सुद्धा लक्षणीय कामगिरी

आठवले गटालाही एका ग्रामपंचायतीमध्ये यश 

भाजप आणि शिवसेनेमध्ये तगडी फाईट सुरुच

भाजपकडून ६ हजार ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा 

आतापर्यंतच्या २ हजार ग्रामपंचायतचे निकाल हाती

राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसकडे अधिक ग्रामपंचायती ताब्यात

मनसेकडे ११ पंचायती

जळगावात तृतीयपंथी अंजली पाटलांचा विजय

नांदेडमध्ये शिवसेनेचा अशोक चव्हाणांना धक्का, बारडमध्ये 17 पैकी 16 जागेवर शिवसेना विजयी

आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पाच ग्रामपंचायत शिवसेनेकडे आणि दोन ग्रामपंचायत भाजपकडे

शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीची चुरस 

दोन्ही पक्षांचा  ३५० हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये विजय 

राष्ट्रवादी २६०, तर काँग्रेस  २१० ग्रामपंचायतीमध्ये विजय

परळीत धनंजय मुंडेंचा करिष्मा कायम 

चंद्रकांत पाटील यांचा घरच्या ग्रामपंचायतीमध्येही पराभव 

परभणी : धारासूर ग्रामपंचायत मध्ये जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम यांच्या गटास पराभवाचा धक्का.

परभणी : खळी ग्रामपंचायतीवर आमदार गुट्टे मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष तथा विद्यमान सरपंच शिवाजी पवार यांचे वर्चस्व.

परभणी : कोद्री ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व, आमदार गुट्टे यांच्या समर्थकांच्या पॅनलचा पराभव.

सांगली : खानापूर तालुक्यात आमदार अनिल बाबर गटाची सरशी

सिंधुदुर्ग : लोरे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व. एकूण  ९ जागांपैकी  ६ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी, तर भाजपचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत. 

सांगली : उमरानीत सत्तांतर भाजपला ११ जागा ,काँग्रेस चार जागा

परभणी : मैराळसावंगी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व.७ पैकी ७ भाजपचे उमेदवार विजयी

परभणी : युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रणित खजे यांच्या गटास इरळद  गावात पराभवाचा धक्का

बीड : येवता ग्रामपंचायत बजरंग सोनवणे गटाच्या ताब्यात 11 पैकी 07 जागांवर विजय

सांगली : मांजर्डेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकतर्फी विजय 15-0

सांगली : आंधळी येथे आय काँग्रेस पक्षाचे 8 उमेदवार विजयी

सांगली : कवठेएकंद मध्ये सत्तांतर. विद्यमान सत्ताधारी राष्ट्रवादीचा पराभव. भाजप-शेकाप युतीचा विजय 

नगर : पोपटराव पवार यांना २८२ मते तर प्रतिस्पर्धींना ४४ मते

नगर : हिवरे बाजार मध्ये ७ विरूद्ध ०; पोपटराव पवारांची एकहाती सत्ता

नगर : हिवरे बाजार मध्ये पोपटराव पवार यांची सत्ता अबाधित; विरोधी उमेदवार यांचे डिपॉझिट जप्त

परभणी : जिल्हा परिषद सदस्य तथा आमदारकीच्या उमेदवार करुणा कुंडगीर यांचा बोथी गावात सपशेल पराभव

परभणी : धनगरमोहा येथे युवा ऊद्योजक भगवान खांडेकर यांच्या पॅनलचे ९ पैकी ८ जागांवर विजय. एक जागा एक मताने पराभूत