Sat, Oct 24, 2020 23:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यपाल कोश्यारींनी ‘ते’ शब्द टाळायला हवे होते : अमित शहा

राज्यपाल कोश्यारींनी ‘ते’ शब्द टाळायला हवे होते : अमित शहा

Last Updated: Oct 18 2020 8:57AM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

भाजपमुळे अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला वाचा फुटल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले. केवळ टीआरपीसाठी सुशांत मृत्यू प्रकरणाचे मीडिया ट्रायल्स योग्य नव्हते तसेच हा तपास आधीच सीबीआयकडे द्यायला हवा होता, असे गृहमंत्री शहा म्हणाले.

कोरोनामुक्‍त झाल्यानंतर शहा यांची ही पहिलीच मुलाखत होती. यावेळी त्यांनी देशभरातील जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा देत सरकारी सूचनांचे पालन करत नवरात्रौत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

यावेळी शहा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे खुली करण्यासाठी लिहिलेल्या पत्रावर भाष्य केले. राज्यपालांनी काही शब्द टाळले असते, तर बरे झाले असते. आपण ते पत्र वाचले, राज्यपालांनी एक संदर्भ देताना पत्रात केलेला उल्‍लेख टाळायला हवा होता, असे अमित शहा म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीवर बोलताना शहा म्हणाले की, नितीशकुमार हेच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील. नितीशकुमार हे आमचे जुने सहकारी असल्याने आघाडी मोडण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही.

 "