Sat, Dec 05, 2020 02:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रातील जनतेला कोरोना लस मोफत देणार

महाराष्ट्रातील जनतेला कोरोना लस मोफत देणार

Last Updated: Oct 25 2020 1:33AM
मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मोफत दिली जाईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. ही माहिती त्यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने बिहारमधील नागरिकांना कोरोनाची मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आता महाराष्ट्रातही मोफत लसीची घोषणा करण्यात आली आहे. 

याबाबत आधिक माहिती देताना मलिक म्हणाले, बिहारमध्ये भाजपचा पराभव झाला, तरी देशभर लसीकरण मोफतच केले जाणार आहे. केंद्र सरकारने मोफत लसीकरणासाठी पाऊल उचलले नाही, तरी महाराष्ट्रात ही लस मोफत दिली जाणार आहे. खरे तर देशभर सर्व जनतेला लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.