Thu, Aug 06, 2020 04:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील पाच हजार पोलीसांना कोरोना

राज्यातील पाच हजार पोलीसांना कोरोना

Last Updated: Jul 05 2020 1:34AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 तास लोकांच्या सेवेत असणार्‍या राज्यातील सुमारे पाच हजार 175 पोलीस कर्मचारी, अधिकार्‍यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील सुमारे चार हजार पोलीसांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 64 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईतील 40 पोलीसांचा समावेश आहे. सध्या 111 पोलीस अधिकारी व 929 पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलीसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. लॉकडाऊनच्या काळात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1 लाख 45 हजार 896 गुन्हे नोंद नोंदवले आहेत. तर, 29 हजार 607 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहविभागाने केले आहे.