Sat, May 30, 2020 13:50



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बहुतांश मुंबईत कोरोना पोहोचला

बहुतांश मुंबईत कोरोना पोहोचला

Last Updated: Apr 06 2020 1:18AM




मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महापालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून, रुग्ण आढळलेले सर्व भाग सील करण्यात आले आहेत. गोरेगाव, जोगेश्वरी, वरळी, ग्रँट रोड, धारावी आदी कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून जाहीर झाले आहेत आणि महापालिका व शासन यंत्रणा कोरोना रोखण्यासाठी रात्रंदिवस एक करीत आहे. शनिवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक 58 कोरोना रुग्ण पालिकेच्या प्रभादेवी जी दक्षिण विभागात आहेत. यातच वरळी कोळीवाड्याचाही समावेश आहे.

त्याखालोखाल ग्रँटरोड डी विभाग हद्दीत कोरोनाचे 31 रुग्ण आढळले. अंधेरी के पूर्व व अंधेरी के पश्चिम विभागात अनुक्रमे 24 व 25 रुग्ण सापडले आहेत. मुंबईच्या कुलाबा ते मुलुंड व पश्चिमेला दहिसर पर्यंत प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत कोरोना रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, कोणत्याही विभागात एक रुग्ण आढळला तरी, तो संपूर्ण विभाग सील केला जात आहे. अशी 250 पेक्षा जास्त ठिकाणे सील झाली आहेत.