Wed, May 12, 2021 00:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोना धोकादायक वळणावर!

कोरोना धोकादायक वळणावर!

Last Updated: May 23 2020 1:19AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत शुक्रवारी तब्बल 1751 कोरोना रुग्णांची भर पडल्याने मुंबईतील रुग्णसंख्या 27 हजार 68 वर पोहोचली आहे. मुंबईतील वाढता  प्रादुर्भाव लक्षात घेता या आजाराच्या काळात आपण पॅरोबोलिक कर्व्हच्या वरच्या टोकाच्या थोडेसे आधी होतो. आता मात्र कोरोनाची साथ धोक्याच्या पातळीच्या दिशेने पुढे सरकली आहे, असे कोरोना रोखण्यासाठी स्थापन झालेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले. राज्यातही शुक्रवारी 2 हजार 940 इतक्या विक्रमी संख्येने नवे रुग्ण वाढले. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्र कोरोना रुग्णसंख्येचा 50 हजारांचा टप्पा पार करण्याची भीती आहे. 

मुंबईत गेल्या पाच दिवसांत तब्बल 5 हजार 916 रुग्ण वाढले. सोमवार 18 मे रोजी 21 हजार 152 कोरोना रुग्ण होते. शुक्रवारी ही संख्या 27 हजार 68 पर्यंत पोहोचली. मुंबईत मृत्युमुखी पडलेल्या 27 जणांपैकी 22 जणांना दीर्घकालीन आजार होते, असे पालिकेकडून सांगण्यात आले. मुंबईत आतापर्यंत 7080 रुग्ण बरे झाले आहेत, तर 909 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शुक्रवारी एका दिवसात सापडणार्‍या आजवरच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला होता. मात्र शुक्रवारी रुग्णसंख्या ही तीन हजारांच्या जवळ पोहोचली.

त्यामुळे राज्यात कोरोना संसर्ग अधिक वेगाने पसरू लागल्याने  राज्य सरकारच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. शुक्रवारी 857 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 12 हजार 583 रुग्ण बरे झाले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.  राज्यात 4 लाख 69 हजार 275 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 28 हजार 430 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात शुक्रवारी 63 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांची एकूण संख्या ही 1 हजार 517 झाली आहे. शुक्रवारी झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये 27, पुण्यात 9, जळगावमध्ये 8, सोलापुरात 5, वसई-विरारमध्ये 3, औरंगाबाद  शहरात 3, सातार्‍यात 2, मालेगाव 1, ठाणे 1, कल्याण     डोंबिवली 1, उल्हासनगर 1, पनवेल 1 तर नागपूर शहरात 1 मृत्यू झाले आहेत. मृत्यूंपैकी 37  पुरुष तर 26 महिला आहेत.

पावसाळ्यात रुग्ण वाढणार

दरम्यान, पावसाळ्यात या कोरोना विषाणूची तीव्रता अधिक वाढेल असे स्पष्ट संकेत टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असताना भारतात महाराष्ट्र राज्यात आणि विशेषतः मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच आता पावसाळाही तोंडावर आला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. संजय ओक म्हणाले, या संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. मात्र लोकांची मानसिकताही बदलण्याची गरज आहे. बरे झालेल्या रुग्णाला त्याच्या घराच्या आसपासची लोकं घेत नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आलेले संकट मोठे आहे. त्यामुळे थोडी त्रेधातिरपीट उडत आहे असेही ते म्हणाले.

कोविडचा आकडा वाढत असला तरी तो विस्फोटक नाही. इटली, स्पेनमध्ये झाले तसे आपल्याकडे झाले नाही. कारण आपल्या आरोग्य यंत्रणेने चांगले काम केले, असे स्पष्ट करीत डॉ. ओक म्हणाले, कोविडबाबत म्हणावी तेवढी साक्षरता झालेली नाही. सातव्या दिवसानंतर रुग्णांवरील कोविड क्षीण झालेला असतो. अशा गोष्टी लोकांना माहीत नाहीत. अशा रुग्णांकडून रोगाचा प्रसार होण्याचे प्रमाण खूपच कमी झालेले असते असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

कोरोना टेस्टचा दर जास्त आहे, याविषयी बोलताना ते म्हणाले, खर्च जास्त आहे मान्य पण जर टेस्ट करणार्‍या लॅबची संख्या वाढवली तर हा दर कमी होईल. पुढील काही दिवसात हा दर 2500 रु. एवढा खाली येईल. सरकारी रुग्णालयात बेड्स वाढवल्या आहेत. खासगी रुग्णालयातही जागा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जे जे च्या प्रांगणात सिमेंट काँक्रिटच्या ठिकाणी 500 बेड्सचे आयसीयू तयार करण्याचा प्लॅन आहे. मुंबईत रियल टाईम डॅशबोर्ड तयार करण्याचे काम पूर्णत्वास जात आहे, अशी माहितीही डॉ. ओक यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिल